Do this to boost immunity after the age of 40

वयाच्या ४० शी नंतर रोगप्रतिकार वाढवण्यासाठी ‘हे’ करा

हॅलो आरोग्य ऑनलाईन ।  वयाच्या ४० व्या वर्षी आपल्या रोगप्रतिकार शक्तीत वाढ झाली नाही किंवा त्या वयात रोगप्रतिकार शक्ती कमी कमी होत गेली तर मात्र आरोग्याचा इतर समस्या या वाढू शकतात. वय जास्त झाले कि , काहींना काही प्रमाणात आरोग्याच्या समस्या या वाढत असतात पाय दुखणे , पायाला गोळे येणे , थकवा जाणवणे, थोडे अंतर चालले तरी धाप लागणे अशा समस्या या वाढत जातात. अशा वेळी आहार हा योग्य , संतुलित आणि पुरेसा असेल तर मात्र या समस्या दूर होण्यास मदत होते .

चिया बिया —

आहारात या बिया असल्याने अशक्तपणा हा जास्त जाणवत नाही. तसेच वृद्धत्वाच्या उपायांवर सुद्धा हा बिया फार लाभकारक आहेत . अनेक महिलांना वयाच्या ४० व्या वर्षीच वृंधत्व कमी कमी होते . त्याच्यावर उपाय म्हणून या बिया फार पोषक आहेत . या बिया प्रोटिन्स पुरवण्याचे काम करते. तसेच जर तुम्हाला अशक्तपणा खूप जाणवत असेल तर त्या वेळी शरीराला मजबूत ठेवण्याचे काम हे प्रोटिन्स करत असते.

बदाम आणि अक्रोड —-

प्रत्येक स्त्री ने आपल्या आहारात या ड्राय फ्रुटस चा समावेश  असणे गरजचे आहे. बदाम हे प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते . तसेच स्त्रियांचा शरीरात जी काही कमतरता आहे . ती भरून काढण्याचे काम हे बदाम करत असते . आपल्या शरीराला वेगवगेळी खनिजे पुरवण्याचे काम अक्रोड करत असते. त्यामुळे अशक्तपणा हा जास्त जाणवणार नाही.

अंडी —

आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी आणि लोह याचे प्रमाण संतुलित राहण्यासाठी अंड्याचा वापर हा आहारात करणे आवश्यक आहे. त्यामुळे पायांच्या दुखण्याच्या समस्या या हळू हळू कमी होण्यास मदत होते.

मासे —-

आपल्याला मेंदूच्या चालनेत वाढ होण्यासाठी मासे हे लाभकारी आहेत . मासांच्या शरीरावर जे काही तेल निर्माण होते . ते स्त्रियांच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी ते तेल फार गुणकारी आहे . ज्या काही ओटीपोटाच्या समस्या असतील तर त्या समस्या दूर कारण्यास मासे मदत करतात . तसेच बी १२ चा उत्तम स्रोत म्हणून मासे याचा आहारात समावेश केला जातो.