|

कांदा चिरताना तुम्हालाही रडू येतं? मग जाणून घ्या कारण आणि करा हे उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कांदा चिरताना अनेकदा डोळ्यांतून घळाघळा पाणी येते. यामुळे कांदा कापताना डोळे इतके चुरचुरतात कि कांदा कापण्यापेक्षा जास्त डोळे पुसावे लागतात. खरतर याचे मुख्य कारण असे कि, कांद्याच्या पेशींमध्ये असणार्‍या दोन तेलांपैकी एका तेलामध्ये वासयुक्त आणि डोळ्यांना दाहक असणारे घटक असतात. यामुळे कांडा कापतेवेळी साहजिकच डोळ्यातून अश्रू येतात.

या घटकातील एका रेणूत ६ कार्बन, १२ हायड्रोजन आणि २ गंधकाचे अणू असतात. त्यामुळे अमिनो अॅसिड, सल्फोक्सिड अॅसिड आणि अनजाईम अॅसिड याच्या एकत्र होण्याने सल्फोनिक अॅसिड तयार होते. त्यामुळे हे अॅसिड हवेत पसरते आणि डोळ्यांतील अश्रूंमध्ये संयोग पावून आपल्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहू लागतात. मात्र कांदा चिरताना हा त्रास होवू नये या करीत अगदी साधे आणि सोपे उपायही आहेत. ते जाणून घेण्यासाठी खाली वाचा.

१) कांदा कापण्यापूर्वी किमान २० ते २५ मिनिटे तो फ्रिजरमध्ये ठेवून द्या. यामुळे त्याचा चुरचुरीतपणा कमी होतो.

२) कांदा कापतेवेळी त्याचा वरचा पापुद्रा काढून टाका. कांद्याचा वरचा भाग आधी कापा पण पातीकडील भाग सर्वांत शेवटी कापा. कारण, या भागात तुम्हाला रडवणारा घटक सर्वात जास्त असतो.

३) शक्य असल्यास, वाहत्या पाण्याखाली काळजीपूर्वक कांदा कापला तरी चालेल. यामुळे त्यातील सलफ्युरिक अॅसिड पाण्यातच धूवून जाते. परिणामी डोळ्यांना त्रास होत नाही.

४) चांगली धार असलेली सूरी कांडा कापण्यासाठी वापरा. यामुळे कांद्यातील डोळ्यांना त्रास देणारे रसायन विघटीत होत नाही. ते आपल्या जागेवरच राहते. यामुळे त्याचा चुरचुरपणा कमी होतो.

५) कांदा कापल्यानंतर तो काही वेळानंतर वापरायचा असेल तर त्याला थंड पाण्यात टाकून ठेवा म्हणजे त्याचा वास किंवा चव बिघडणार नाही आणि त्यातून हवेत मिसळणाऱ्या घटकांचे विघटन होणार नाही. यामुळे डोळ्यातून अश्रू येण्याचे प्रमाण घटेल.

६) स्वयंपाकाची फार घाई नसेल तर कापलेल्या कांद्याचे तुकडे थंड पाण्यात टाकून ठेवा आणि कापायचे असतील तेव्हा काढा. त्यामुळे कांदा कापताना डोळ्यात पाणी येणार नाही.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *