Do you know about Amchoor powder?
|

आमचूर पावडर बाबत माहित आहे का ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्या आहारात आमचूर पावडर हि वापरली जाते पण त्याचे प्रमाण हे इतर पदार्थापेक्षा फार कमी असते. आमचूर पावडर यामुळे आपल्या आहारातील पदार्थाना चव आणि सुगंध यायला सुरुवात होते. अनेक पोषक तत्वांनी परिपूर्ण असलेले हे आमचूर आहे . आमचूर हे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे. घरगुती मसाल्याच्या स्वरूपात आमचूर चा वापर प्रत्येक भाज्यांमध्ये केला जातो. सहसा प्रत्येक घरात आमचूर पावडर हि बाजारातून घेतली जाते. पण घरगुती पद्धतीने सुद्धा आमचूर पावडर तयार केली जाऊ शकते. त्याच्याबद्धल काही प्रमाणात माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात …

आमचूर पावडर म्हणजे काय ?

आमचूर पावडर हि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप महत्वाची असते. आमचूर पावडर हि कच्चा आंब्यापासून तयार केली जाते. कच्चा आंबा हा उन्हात सुकवून त्याची पावडर सुद्धा आपल्या आहारात वापरू शकतो. आशियाई देशांमध्ये प्रत्येक भाजीमध्ये काही प्रमाणात आंबटपणा येण्यासाठी आमचूर पावडर चा वापर हा केला जाऊ शकतो.

आमचूर पावडर मध्ये अनेक पोषक तत्वे असतात. आमचूर पावडर हि कच्या कैरीपासून बनवले जाते. कच्या कैरीत जितके पोषक घटक असतात. तेवढेच पोषक घटक हे आमचूर मध्ये पण असतात. आरोग्यासाठी आवश्यक असलेले प्रोटीन , फायबर , साखर , मॅग्नेशियम , जिंक , कॉपर , व्हिटॅमिन सी, आणि व्हिटॅमिन ए सारखे अनेक घटक हे त्याच्यामध्ये असतात. अनेक ज्यूस मध्ये त्याचा वापर हा केला जातो. त्यामुळे ज्यूस चा स्वाद वाढण्यासाठी आमचूर चा वापर हा जास्त प्रमाणत करतात. आमचूर पावडर हे कोणत्याही रोगांवर रामबाण उपाय म्हणून वापरले जात नसले तर त्याचा फायदा हा आपल्या शरीराला जास्त आहे.

वजन कमी करण्यास मदत करते —

आपले वजन जर वाढत असेल तर ते दूर करण्यासाठी आपल्याला आमचूरचा वापर केला जाऊ शकतो. आमचूर मध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि त्याच्यामध्ये असलेले फायबर चे प्रमाण हे वजन कमी करण्यास खूप महत्वाची भूमिका बजावते. सुका आंबा हे वजन काही प्रमाणात कमी करते.

कॅन्सर वर नियंत्रित आणण्यासाठी —

आमचूर मध्ये असणारे मॅगिफेरीन तत्व हे आपल्याला कॅन्सर चा आजार दूर करण्यास जास्त मदत करते. कैरीच्या आतले भाग , त्याची साल आणि कॅन्सर वर रोख लावण्यास प्रतिबंधित करत असते.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींसाठी —

ज्या लोकांना मधुमेह याचा त्रास आहे तर त्याच्यामध्ये असलेले असलेले घटक हे मधुमेह नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यावेळी कारल्याचा रस मधुमेहासाठी आपण वापरतो त्या वेळी त्याच्यावर आमचूर चा वापर हा काही प्रमाणात केला गेला पाहिजे.

डोळ्यांसाठी गुणकारी —

कैरीमध्ये असणारे बीट कॅरेटिन जास्त असते त्यामुळे डोळ्यांना त्याचे खूप फायदे होतात. बीटा कॅरेटिन हे मोतीबिंदूच्या आजार दूर करण्यास मदत करते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी आमचूर हि महत्वाची भूमिका बजावते.

पचन क्रियेसाठी महत्वाची भूमिका बजावते —

आपल्याला पचन क्रियेचा जो काही त्रास होत असेल तर दूर करण्यासाठी आमचूर हे आपल्या आहारात वापरले गेले पाहिजे. त्याच्यामध्ये असणारे फायबर चे प्रमाण पचन क्रिया योग्य राहण्यास मदत करते. तुम्हाला जर बुद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर त्यावेळी आमचूर चे पाणी दररोज सकाळी पिले गेले पाहिजेत . पोटातील गॅस दूर करण्यासाठी सुद्धा आमचूर चा वापर हा जास्त प्रमाणात केला जाऊ शकतो.