| | |

आरोग्यदायी सफरचंद खाण्याची योग्य वेळ माहित आहे का?; लगेच जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सफरचंद खाणे हे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे, हे सारे जाणतात. याचे कारण म्हणजे सफरचंद हे एक असे फळ आहे, जे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. याच कारणामुळे अगदी डॉक्टरदेखील दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. यामुळे केवळ भारतातच नव्हे तर जगभरात सर्वाधिक सेवन केले जाणारे फळ म्हणून सफरचंदाची ख्याती आहे. त्याच्या उत्कृष्ट गुणधर्मांमुळे, याला जादूचे फळ असेदेखील म्हटले जाते. सफरचंदामध्ये पुरेसे प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स आणि रोगांशी लढणारे घटक असतात. यामुळे ते दररोज खाल्ल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते. पण मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, कि सफरचंद कोणत्या वेळी खायचे असते? नाही ना? म्हणूनच आज आम्ही तुम्हाला सफरचंद कधी खायचे ते सांगणार आहोत आणि त्याचसोबत सफरचंद खाण्याचे फायदेसुद्धा सांगणार आहोत. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

० सफरचंद खाण्याची योग्य वेळ कोणती?
– आहार तज्ञ सांगतात कि, आपण सफरचंद कधीही खाऊ शकतो. पण सकाळी सफरचंदाचे सेवन केल्यास त्याचा अधिक फायदा होतो. याचे कारण असे कि, सफरचंदात फायबर आणि पेक्टिन मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी याचे सेवन केल्यास ते पचण्यास बहुतांशी त्रास देते. त्यामुळे सकाळी याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अतिशय सर्वोत्तम आहे. म्हणून, सकाळी नाश्ता करताना सफरचंद खा. पण महत्वाचे म्हणजे सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी सफरचंद खाऊ नका.

० सफरचंद खाण्याचे फायदे

१) सफरचंदात असे काही घटक असतात जे शरीरात नव्या पेशींच्या निर्मितीला प्रोत्साहन देतात. शिवाय शरीरातील पेशींचे संरक्षण करतात. त्यामुळे शरीरातील पेशींची कार्यक्षमता टिकून राहते.

२) सफरचंद मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच, ते शरीरातील रक्तात आढळणारी साखर नियंत्रित करते. म्हणून मधुमेहींनी सफरचंद खाणे फायदेशीर आहे.

३) सफरचंदात पेक्टिनसारखे फायदेशीर फायबर्स आढळतात. यामुळे दररोज एक सफरचंद खाल्ल्याने कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.

४) सफरचंदात व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात असते. त्यासोबत लोह आणि बोरॉनदेखील यात असल्यामुळे हाडांना ताकद मिळते. यामुळे दातांच्या समस्या देखील कमी होतात.

५) सफरचंदात आढळणारे फायबर बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी लाभदायक भूमिका निभावते. यामुळे हे आजार असणाऱ्या व्यक्तीसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

६) किडनी स्टोनची समस्या असल्यास ती टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करता येईल.

७) सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.

८) सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने वजन नियंत्रित राहते. यासाठी सफरचंदाचा रस अधिक प्रभावी ठरतो. शिवाय सफरचंदाचा रस रोज सकाळी प्यायल्याने चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात.