Gluacoma
| | |

विज्ञानाला उपचार न सापडलेल्या काचबिंदू आजाराबाबत तुम्हाला या गोष्टी माहिती आहेत काय? देशात १ कोटी २५ लाख लोकं बाधित

हॅलो आरोग्य ऑनलाईन । डोळे हे जुल्मी गडे!!! आपल्या पंचेद्रियांपैकी महत्वाचे इंद्रिय म्हणजे डोळे. सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत सगळीकडेच कामात डोळ्यांचा वापर सर्वात जास्त होतो. मोबाईल, कॉम्पुटर यामुळे आपला सर्वांचा स्क्रीनटाइम खूप वाढला आहे. त्यामुळे डोळ्यांचे विकार लहान मुलांपासून मोठ्यापर्यंत त्रासदायक होत आहेत. ‘काचबिंदू’ नाव ऐकलंय ना कधीतरी, ऐकलं असेल कदाचित पण, त्याचे गांभीर्य कदाचित आपल्या लक्षात आले नसेल. आपल्या देशात एकूण लोकसंख्येपैकी १ % म्हणजेच जवळपास एक कोटी पंचवीस लाख लोक लोकांना काचबिंदू मुळे कायमस्वरूपी अंधत्व आले आहे. आणि त्यात प्रत्येकवर्षी १० लाख रुग्णांची भर पडत आहे. या रोगाची सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे दृष्टी ९०% बिघडल्याशिवाय लक्षातच येत नाही आणि ज्यावेळी लक्षात येते त्यावेळी खूप उशीर झालेला असतो. आता आपणांस याचे महत्त्व कळले असेल. कारण याच्यावर अजून तरी विज्ञानाला उपचार सापडलेला नाही. औषधामुळे किंवा ऑपरेशनमुळे काचबिंदू स्थिर करता येतो पण गेलेली दृष्टी पुन्हा कधीच मिळवता येत नाही. म्हणजे वेळेत योग्य निदान झाल्यास यशस्वी उपचार करता येतात.

काचबिंदूचे प्रकार :
सामान्यपणे ४ प्रकार आहेत १. प्राथमिक/ ओपन अँगल – पुरुषामध्ये प्रमाण जास्त
२. अँगल क्लोजर – महिलांमध्ये प्रमाण जास्त
३. जन्मतःच – लहान मुले
४. दुय्यम – स्टेरॉईडचे सेवन तसेच डायबेटिज,थॉयरॉईड या आजारामुळे किंवा त्याच्या औषधांच्या साईड इफेक्टमुळे

काचबिंदू ची लक्षणे :
सामान्यपणे कोणतीच लक्षणे तत्काळ दिसत नाहीत. पण धुरकट दृष्टी, प्रतिमेच्या कडेला अंधार दिसणे, डोळे लाल होऊन दुखणे, तीव्र पोटदुखी, चष्म्याचा नंबर वारंवार बदलणे, रात्रीचे दिव्याकडे पहिले असता इंद्रधनुष्यासारखे वलय दिसणे.

कारणे :
अनुवांशिकता – कुटुंबातील कोणालाही पूर्वी काचबिंदू किंवा मोतीबिंदू झाला असेल अश्या वेळेला हा आजार होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. दमा, संधिवातासाठी घेतलेल्या औषधामुळे. बॉडीबिल्डिंग, व्यायाम करताना वापरलेल्या स्टेरॉईडने. डायबेटिज, वार्ध्यक्यामुळे. डोळ्याची पूर्वी शस्त्रक्रिया झाली असल्यास.

उपचार :
वयाच्या ४० नंतर डोळ्यांची नियमित सखोल तपासणी करून घ्यावी. काचबिंदूने गेलेली दृष्टि पुन्हा मिळवणे सध्या तरी अशक्य आहे. पण काचबिंदू त्याच अवस्थेत स्थिर करणे किंवा त्याची गती कमी करणे एवढेच डॉक्टरांच्या हातात आहे. तसेच आजाराची नेमकी स्थिती लक्षात आल्यानंतर लेझर ट्रीटमेंट, नव्या पद्धतीच्या मिनिमली इंव्हेजिव शस्त्रक्रिया अंमलात आणल्या जातात. आय ड्रॉप, तोंडाने घ्यायच्या गोळ्या. इत्यादी गोष्टींनी उपचार केले जातात.