bone
|

मनुष्यांच्या हाडांविषयी या गोष्टी माहित आहेत का ?

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  मानवी शरीरातली हाडांची रचना हि ज्या पद्धतीने तयार होती त्यांच्यानुसार शरीराची ठेवणं हि ठेवली जाते. हाडे जर बळकट आणि जाड असतील तर मात्र मात्र आपल्याया हाडांच्या समस्या जाणवणार नाहीत. हाडे बळकट राहण्यासाठी आपल्या हाडांमध्ये कॅल्शियम चे प्रमाण हे जास्त असणे गरजेचे आहे . हाडे हि आपल्या शरीराची रचना करते. तसेच मनुष्याच्या रक्ताची संरचना करण्याचे काम हे हाडे करत असतात. आपल्या शरीरातील कोशिकांचे निर्मिती करण्याचे काम हे सुद्धा हाडे करतात.

आपल्या शरीराच्या अर्ध्या पेक्षा जास्त भागातील हाडे हे हात आणि पायांत असतात. हाडांचे विभाजन हे समप्रमाणात नसते. हातामध्ये २६ आणि पायांमध्ये २७ हाडे असतात. मनुष्याच्या शरीरात सर्वात ठोस हा भाग आपले दात हे असतात. हाडे हि जोपर्यंत आपल्या शरीरात असतात . तोपर्यंत ती हाडे हि जिवंत असतात. हाडांचे नस आणि रक्तवाहिन्यांचे नस हि एकमेकांच्या संपर्कात असतात. लहान मुलांच्यामध्ये प्रौढ व्यक्तीच्या शरीरापेक्षा हे जास्त हाडे असतात. एका वयस्क व्यक्तीच्या शरीरात २०६ हाडे असतात.

हाडांमधून आपल्या शरीरामध्ये पेशी निर्मिती होते. काही आजारात, आणि चुन्याच्या कॅल्शियम च्या अभावामुळे हाड ठिसूळ होऊन मोडते यास अस्थिभंग म्हणतात. स्त्रीयांमधील मासिक पाळी थांबल्यानंतर हाडांमधील झीज वाढते. सिगारेट ओढणे, मद्यपान करणे किंवा अतिसेवनामुळेही हाडांची झीज होऊ शकते. या रोगास ऑस्टीओपोरोसिस म्हणजे अस्थिरोग असे म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासानुसार भारतात हा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा आजार आहे या आजरांची माहिती हि आपल्याला काही प्रमाणात त्रास जाणवत असेल तेव्हाच लागते.