|

मासिक पाळीदरम्यान खरंच वजन वाढत का?; जाणून घ्या काय सांगतात तज्ञ

हॅलो आरोग्य ऑनलाईन। महिलांच्या आयुष्यात मासिक पाळी येणे हि अत्यंत सामान्य आणि नैसर्गिक स्थिती आहे. मात्र या दिवसात होणारा त्रास हा प्रत्येक स्त्रीसाठी वेगवेगळा पण अत्यंत वेदनादायी असतो. मासिक पाळी दरम्यान स्त्रियांच्या शरीरात बरेच बदल होतात. जसे कि, शरीर जड झाल्यासारखे वाटणे, पोटात दुखणे, पाठ दुखणे, शरीरात गरमी जाणवणे. दरम्यान अनेक स्त्रिया सांगतात कि पाळीदरम्यान त्यांचे शरीर जड झाल्यासारखे वाटतेच शिवाय वजनातही वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे. तर काही स्त्रियांना मात्र त्यांच्या वजनात काहीच फरक जाणवत नाही. याबाबत तज्ञांनी काही विशेष बाबी स्पष्ट केल्या आहेत.

महिला रोग तज्ञ सांगतात कि, मासिक पाळीच्या चक्रानुसार आपली मासिक पाळी येत असताना ती येण्यापूर्वी आणि येऊन गेल्यानंतर आपल्या वजनाची नोंद ठेवल्यास वजनातील फरक जाणवतो. मात्र हा फरक प्रत्येक स्त्रीबाबत दिसत नाही. जर आपल्या वजनात बदल दिसून येत असेल तर यामागे काही विशेष कारणे आहेत ती आपल्याला माहित असणे गरजेचे आहे. ती कारणे जाणून घ्या पुढीलप्रमाणे :-

१) ब्लोटींग – पाळीआधी पोट फुगलेले असते. खूप स्त्रियांना पाळीआधी हा बदल हमखास जाणवतो. तसेच पोट भरल्यासारखे वा फुलल्यासारखे वाटते. त्यामुळे आपले पोट सुटले की काय असे वाटते. पण हा त्रास सगळ्यांना होतो असे नाही. पण ही बाब सामान्य आहे. पाळीआधी काही दिवस पोट वाढल्यासारखे वाटतेच. अगदी आपल्या कंबरेचा घेर वाढल्यासारखेदेखील वाटू लागते. पण त्यामध्ये काही तथ्य नाही. प्रत्येकाच्या तब्येतीनुसार यामध्ये बदल होत राहतो.

२) स्तनांच्या आकारात बदल वाटणे – खूप स्त्रियांना मासिक पाळीआधी स्तनाग्रे मोठी दिसण्याचा अनुभव येतो. आहे त्या आकारापेक्षा ती जास्त वाढलेली वा सुजल्यासारखी दिसतात. काही जणींना स्तनाग्रे दुखण्याचादेखील त्रास होतो. मात्र हि समस्यादेखील सामान्य आहे. ज्यांच्या शरीराला अशा प्रकारची सूज चढते वा स्तनाग्रे अचानक मोठी दिसतात त्या स्त्रियांच्या पाठीचे दुखणेही होते. त्यामुळे हे लक्षण सामान्य आहे.

३) शरीर मांसल वाटणे – मासिक पाळी येण्याआधी काही स्त्रियांचे शरीर थुलथुलीत होते. विशेषत: मांड्यांचा आकार हा अधिक वेगळा आणि जाड वाटतो. जांघामध्ये खूप मांस वाढल्यासारखे वाटते. मुख्य म्हणजे शरीरातील मांसल वाढणे सामान्य आहे. त्यामुळे चिंतेचे कारण नाही. मासिक पाळी येऊन गेल्यानंतर संपूर्ण स्थिती पूर्ववत होते.

४) कपडे घट्ट होणे – आपल्या रोजच्या कपड्यांची फिटिंग चुकली की, वजन वाढले असे वाटते. असेच काहीसे मासिक पाळीच्या दिवसात वाटू लागते. कारण या दिवसात बहुतेकदा आपले रोजचे कपडेसुद्धा घट्ट वाटू लागतात. जर असे तुमच्याही सोबत होत असेल तर तुमच्या शरीराला या दिवसात सूज आली आहे हे समजून जा. तुमचे वजन वाढले आहे असा याचा अर्थ होत नाही. तसेच घाबरण्याचे कारण नाही. पाळीनंतर तुमच्या शरीराची सूज उतरते आणि पूर्ववत स्थिती होते.