| |

घामाने अक्षरशः अंघोळ होते?; जाणून घ्या कारणे आणि उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। शरीराला घाम येणे ही एक नैसर्गिक क्रिया आहे. ज्याचा मुख्य हेतू शरीराचे तापमान नियंत्रणात ठेवणे असा आहे. शरीराचे अंतर्गत तापमान वाचल्यामुळे त्वचेखालील स्वेदग्रंथींकडून अधिक प्रमाणात घाम स्त्रवला जातो. त्वचेवरील या घामाचे बाष्पीभवन होण्यासाठी शरीरामधील उष्णता वापरली जाते आणि शरीरा अंतर्गत थंडावा तयार होतो. अति उष्णतेबरोबरच मानसिक उद्दिपनामुळे सुद्धा स्वेदग्रंथी उद्दिपित होतात. जेव्हा तुम्ही खूप घाबरता तेव्हा आणि कामभावनांमुळे सुद्धा शरीर गरम होऊन स्वेदग्रंथी उद्दिपित होतात.

त्याचप्रमाणे शरीराच्या मांसपेशींच्या आकुंचन-प्रसरणामुळे (अर्थात शरीराला होणार्‍या व्यायामामुळे) सुद्धा स्वेदग्रंथी अधिक प्रमाणात घाम निर्माण करतात, जो शरीरामध्ये तयार झालेली अधिकची उष्णता बाहेर फेकण्याचा प्रयत्न असतो. एकंदर काय तर घाम येणे ही शरीराला आवश्यक अशी क्रिया आहे. पण, खूप उष्ण वातावरण वा गर्मीचे दिवस सुरु असतील तर घाम येणे सामान्य आहे. पण असे काहीही नसेल आणि तरीही तुम्हाला प्रचंड प्रमाणात घाम येत असेल तर हि बाब सामान्य कशी मानावी? निश्चितच हि बाब गंभीर असू शकते. पण तरीही अनेकदा याकडे लोक फार गंभीरतेने पाहत नाहीत. याचा पुढे जाऊन त्रास होतो.

० जाणून घेऊ हि स्थिती घाम की हायपरिड्रोसिस
– शरीरातून घाम येणे किंवा खूप जास्त घाम येणे या दोन वेगवेगळ्या स्थिती आहेत. जास्त घाम येण्याच्या स्थितीला सामान्यपणे हायपरिड्रोसिस म्हटले जाते. घाम येणे ही शरीराशी संबंधित असणारी एक सामान्य प्रक्रिया आहे. जर एखाद्या व्यक्तीचं शरीर वेगळ्याप्रकारे तीव्र काम करत असेल तर त्याला जास्त घाम येतो. तसं पहायला गेलं तर जास्त घाम आल्याने याचा शरीरावर काहीही विपरीत परिणाम होत नाही. पण यामुळे व्यक्तीला विविध अडचणींचा सामना करावा लागतो.

० जाणून घ्या कारण
– डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, जास्त घाम येण्यामागे अनेकदा चेतासंस्था कारणीभूत असते. अनेकांच्या हाता -पायांना जास्त घाम येतो. हि स्थिती कार्यप्रणालीत बिघाड असल्यास होते. पण याने घाबरण्याची गरज नाही. यासाठी शल्य चिकित्सा करुन घामाच्या ग्रंथी काढून हि समस्या सोडवली जाते. याने त्या व्यक्तीला भविष्यात जास्त घामाची समस्या होत नाही. तर काही व्यक्तींमध्ये मासिक पाळी, गर्भावस्था, थॉयराईड, टयूबरकुलोसिस, स्टोक, पार्किसंस रोग, ल्यूकेमिया आणि लिम्फोमा यामुळेही जास्त घाम येत असल्याचे बघायला मिळते.

० डॉक्टरांचा सल्ला आवश्यक – खालील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे समजून घ्या.

१) रात्री झोपताना वा झोपेत अधिक घाम येणे.

२) शरीराच्या केवळ एकाच भागात सतत आणि जास्त घाम येणे.

३) शरीराच्या प्रत्येक अंगाला प्रमाणापेक्षा जास्त घाम येणे.

४) काही औषधांचे सेवन केल्यास जास्त घाम येणे.

५) कधी कधी अधिक घामामुळे अस्वस्थ वाटणे.

० उपाय – घाम येण्याची समस्या सर्जरी करुनच दूर केली जाते. पण हायपरिड्रोसिसची लक्षणे नियंत्रित करण्यासाठी काही घरगुती तर काही आयुर्वेदिक उपचारही केले जाऊ शकतात. शिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने स्प्रे, लोशन, रोल ऑन इत्यादी वापरु शकता.