| |

सकाळ, दुपार, रात्र वाट्टेल तेव्हा अंघोळ करता? हि सवय वेळीच मोडा नाहीतर….;जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अंघोळ करणे ही आपल्या शरीराची प्राथमिक गरज आहे. कारण अंघोळीमूळे शरीरासोबत मनसुद्धा अगदी प्रसन्न राहत. परिणामी अख्खा दिवस फ्रेश जातो. तसे पहाल तर अंघोळी विषयी लोकांच्या विविध सवयी असतात. जसे की काही लोक सकाळीच अंघोळ करतात. तर काही सकाळी, दुपारी आणि अगदी रात्रीही अंघोळ कुणी गरम पाण्याने तर कुणी थंड पाण्याने आंघोळ करतं. इतकेच नव्हे तर काहीजण अंघोळ करतच नाहीत. आठवड्यातून एकदा अंघोळ करणारे देखील खूप जण आहेत. शिवाय काही लोक पटपट अंघोळ करतात तर खूप वेळ लागतो. बापरे.! व्यक्ती तितक्या प्रकृती हेच खर. पण तुम्हाला माहीत आहे का? अंघोळ करण्याचीही एक विशिष्ट वेळ असते.

होत. तुम्ही बरोबर वाचलात. अंघोळ करण्याची एक वेळ असते. आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे योग्य वेळेत अंघोळ न केल्याचे शरीराला दुष्परिणाम भोगावे लागतात. याशिवाय आयुर्वेद म्हणते की १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ आंघोळ करणं आरोग्यासाठी हितवर्धक नसते. कारण, जितका जास्त वेळ आपले शरीर पाण्यात राहते तितके त्वचेतील नैसर्गिक तेल कमी होते. ज्यामुळे त्वचेचे तेज निघून जाते. म्हणूनच आम्ही आज तुम्हाला अंघोळ करण्याविषयीच्या काही खास टिप्स देणार आहोत. ज्याचा फायदा तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी होईल.

१) अभ्यंग स्नान – अंघोळ करण्यापूर्वी १० मिनिटं अभ्यंग म्हणजे डोक्याला तेल मालिश करणं आवश्यक आहे. यासाठी, आयुर्वेद सांगते की, बारीक लोकांनी म्हणजेच वात प्रकृती असलेल्या माशाचं तेल लावावं तर पित्त प्रकृतीच्या लोकांनी क्षीरबला तेल लावावं. याशिवाय कफ प्रकृतीच्या लोकांनी तेलाने मालिश करू नये.

२) अंघोळीसाठी खूप थंड/ खूप गरम पाणी नकोच – खूप थंड किंवा खूप गरम पाण्यापेक्षा अंघोळीसाठी कोमट पाणी वापरणं अधिक फायदेशीर आहे. कारण खूप गरम किंवा थंड पाण्याने आंघोळ केल्यामूळे त्वचा कोरडी होते. शिवाय आपल्या त्वचेतील नैसर्गिक तेल कमी झाल्यास त्वचा निर्जीव दिसते.

३) शॉवरजेल आणि साबणाला पर्याय – आंघोळीसाठी सौम्य शॉवर जेल किंवा नैसर्गिक साबण वापरावा. याहीपेक्षा उत्तम म्हणजे जेल साबणाऐवजी त्रिफळा पावडर, बेल पावडर आणि डाळीचे पीठ एकत्र करून याचे उटणे अंघोळीसाठी वापरावे. यामुळे त्वचेतील नैसर्गिक तेल टिकून राहते.

४) शॉवरखाली अंघोळ टाळा – कारण डोक्यापासून पायापर्यंत हळूहळू पाणी जातं. ज्यामुळे शरीराचे तापमान उच्च ते सौम्य असे वेगाने उतरते. जे शारीरिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. शिवाय शॉवरच्या वेगवान प्रवाहाच्या तुलनेत तांब्याने बादलीतील पाणी हळूहळू अंगावर ओतल्याने त्वचेतील नैसर्गिक तेल टिकवून ठेवले जाते. त्यामुळे शॉवर ऐवजी बादलीत पाणी घेऊन तांब्याने अंघोळ करा.

५) मऊ त्वचेसाठी तिळाचं तेल:- रोज आंघोळीनंतर ओल्या त्वचेवर तिळाचं तेल लावा आणि नंतर त्वचा मऊ टॉवेलने पुसा. यामुळे आपली त्वचा तुकतुकीत आणि मऊ राहिल.