Do you use cold drinks as a soft drink during summer days?

उन्हाळ्यात तुम्ही थंडपेये म्हणून कोल्ड्रिंक चा वापर करताय का ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । सध्याचे वातावरण हे उन्हाळयाच्या दिशेनं आहे . त्यामुळे उन्हाच्या वाढीचा सर्वात जास्त त्रास आपल्या आरोग्यावर आणि त्वचेवर होत असतो. उन्हाळ्याच्या दिवसांत खूप जास्त प्रमाणात सूर्यकिरणे हे आपल्या शरीरावर पडत असतात. त्यामुळे त्याचा त्वचेला खूप त्रास हा होतो. शरीर थंड होण्यासाठी नेहमी आपण काहीतरी थंड खाण्याचा किंवा पिण्याचा प्रयत्न करतो. पण अनेक वेळा सॉफ्ट ड्रिंक म्हणून आपण कोल्ड्रिंक्स चा वापर सुद्धा केला जातो. पण आपल्या शरीरासाठी कोल्ड ड्रिंक्स योग्य आहे का ? ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात ….

— आपण विकत घेत असलेले कोल्ड्रिंक्स हे आपल्या शरीराला अजिबात योग्य नाही . कारण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात केमिकल घटकांचा समावेश केलेला असतो. आपण जेवढी साखर दिवभरात खात नाही त्याहूनी जास्त साखर हि कोल्ड्रिंक्स मध्ये असते त्यामुळे ते आपल्या शरीराला अजिबात योग्य नाही.

— ज्या लोकांना शुगर हि जास्त आहे . त्या लोकांनी आपल्या आहारात कोल्ड्रिंक्स घेऊ नयेत .

— कॅफीन आढळणारे कोल्ड्रिंक पिण्याने २० मिनिटांत आपल्या शरीरातील ब्लड शुगर लेवल वाढून इंसुलिनसह अत्यंत तीव्रतेने वरती येतं. याने शुगर आणि सोडियमची मात्रा वाढते ज्यामुळे आपल्या आरोग्यासंबंधी वाईट परिणाम भोगावे लागू शकतात.

— कोल्ड्रिंक पिण्याने आपले यकृत ही शुगर चरबी म्हणून साठवून घेतो. ज्याने आपले वजन वाढू लागते .

— शरीरात अनावश्यक चरबीचे प्रमाण हे वाढत असते.

— शरीराला कदाचित मधुमेह , किंवा हृदयाचा त्रास हा वाढू शकतो.

— ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात केमिकल असते . ते आपल्या शरीराला हानिकारक च असते .

— त्याचा साठा हा जास्त काळ टिकून राहण्यासाठी त्याच्यामध्ये वेगवगेळ्या केमिकल चा वापर हा केला जातो. तसेच त्याच्यामध्ये कार्बन चे प्रमाण हे जास्त असते .