| |

पावसाळी कोरडे वातावरण त्वचेचे नुकसान करतेय? तर वापरा या टिप्स; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। पावसाळ्यामुळे हवेत गारवा निर्माण होतो. हा नैसर्गिक गारवा सगळ्यांना हवाहवासा वाटतो. पण ओलाव्यामुळे संसर्गांचा धोका वाढतो. शिवाय हवेतील अति थंडावा त्वचेचे विकार होण्यास कारणीभूत असतो. त्यामुळे पावसाळ्यात त्वचा कोरडी होते. यामुळे हात आणि पायांच्या तळव्यावरची त्वचा निघू लागते. परिणामी त्वचेची आग होणे, कोमल तळवे खरबरीत होणे, पायाच्या टाचा फाटणे असे त्रास होतात. काही लोकांना हे त्रास अधिक प्रमाणात होतात. तसे हे त्रास काही दिवसांनी थांबतात परंतु त्वचा सोलपटणे किंवा रखरखीत होणे यामुळे चार चौघात जाताना बुजल्यासारखे वाटते. पण आता काळजी करू नका या पावसाळ्यात तुम्ही बिंदास्त वावरू शकाल यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. मात्र यासाठी हा लेख तुम्हाला पूर्ण वाचावा लागेल.

० पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स वापरा. खालीलप्रमाणे:-

१) दररोज झोपण्याआधी आणि घरातून बाहेर पडण्याआधी हाता पायाला मॉश्चरायझर लावा. यामुळे त्वचेचा कोरडेपणा दूर होईल आणि त्वचेचा मुलायमपणा कायम राहील. परंतु मॉश्चरायझर सुवास नसलेले वापरावे.

२) कोरड्या वातावरणामुळे त्वचा निघत असेल तर सुगंधरहित व उत्तम दर्जाचे क्लिन्जर वापरावे. कारण सुगंधरहित क्लिन्जर बॅक्टेरीया कमी करण्यासाठी लाभदायक मानले जाते. यासाठी क्लिन्जर त्वचेवर लावून पुसून टाकावे. यामुळे काही प्रमाणात त्वचेला फायदा होऊ शकतो.

३) कोमट पाण्याने आंघोळ केल्यानेही त्वचेला फायदा होतो. त्यामुळे किमान ५ ते १० मिनटे कोमट पाण्याने आंघोळ करावी. यामुळे त्वचा लवकर कोरडी होत नाही. शिवाय कोमट पाण्यामुळे त्वचेवरील अतिरिक्त तेल कमी होईल. मात्र जास्त गरम पाणी वापरू नये. यामुळे त्वचा कोरडी होते.

४) त्वचेसंबंधीत कोणत्याही विकारांसाठी मध एक उत्तम औषधी मानली जाते. त्वचेवरील इन्फेक्शन कमी करण्यासाठी मध लाभ देते. त्यामुळे सेन्सेटिव्ह त्वचेसाठी मध हातापायावर लावा.

५) कोरड्या वातावरणात विशेष करून आहाराकडे लक्ष द्यावे. कारण आहारासंबंधित सवयींमुळेदेखील त्वचेवर परिणाम होत असतो. त्यामुळे पावसाळ्यात बॅलन्स डाएट करा. यासाठी आहारात मासे, अळशी, सब्जा, ड्रायफ्रुट यांचा समावेश करा.

६) त्वचा कोरडी होणे किंवा संपत जाणे या समस्येचे आणखी एक कारण म्हणजे हवामानातील कोरडेपणामुळे शरीर डिहायड्रेट होणे. परिणामी त्वचेचे नुकसान होणे अत्यंत साहजिक आहे. त्यामुळे भरपूर पाणी प्या. दिवसभरात किमान ८ ग्लास पाणी प्यायल्याने शरीर आणि त्वचा हायड्रेट राहते. परिणामी त्वचेच्या समस्या उदभवत नाहीत. त्यामुळे दिवसभरात पाणी किंवा ज्युस पिण्यावर भर देणे फायद्याचे ठरते.