| |

अहो काय सांगता? पोटाला पण सर्दी होते?; जाणून घ्या उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। हिवाळ्याच्या दिवसात लवकर न समजणारे असे आजार आणि व्याधी शरीराला लागतात. कारण थंडीच्या दिवसात एक विशिष्ट आद्रता हवामानात असते. यामुळे छातीत कफ साचून सर्दी, खोकला होणे ही सामान्य समस्या जाणवते. पण आज आम्ही तुम्हाला ज्या गोष्टीविषयी सांगणार आहोत ते वाचून तुम्हाला जरा हसूच फुटेल आणि आश्चर्यदेखील वाटेल पण खरंच सांगतो यात तथ्य आहे. जशी नाकाला होते सर्दी तशीच पोटालाही सर्दी होते. होय. होय. तुम्ही अगदी बरोबर वाचताय. पोटाला सर्दी होते आणि यामुळे सर्दी, खोकला, उल्टी, जुलाब यासारखे आजारही होतात. चला तर जाणून घेऊया याविषयी अधिक माहिती खालीलप्रमाणे:-

० पोटाला सर्दी कशी होते?
– थंडीत शरीराला उष्ण ठेवण्यासाठी भरपूर कॅलरीजची गरज असते. या व्यतिरिक्त कॅलरीजमुळे पचनप्रक्रिया सक्रिय होते. म्हणून थंडीत सतत भूक लागते आणि आपण सतत खाते. यामुळे पचनसंस्थेवर ताण पडतो. परिणामी पचन संस्थेचे कार्य मंदावते. त्यामुळे अॅसिडीटी, आतड्यांना दुखापत, पचनक्रिया मंदावते. यामुळे पोटात ओलावा जमा होतो आणि थंडी वाजते.

० पोटाच्या सर्दीवर घरगुती उपाय –

१) पोटाच्या सर्दीवर जीरे, धणे, बडीशेप, ओवा आणि मेथीचा काढा प्यावा. हा काढा दिवसातून २ वेळा प्या. यामुळे पोटातील सर्दीपासून आराम मिळेल. कारण यातील प्रत्येक पदार्थ अँटी ऑक्साईड, अँटी व्हायरल,अँटी सेप्टीकचे काम करतो.

२) पोटातील सर्दीपासून आराम मिळवण्यासाठी जीरे, धणे, ओवा आणि मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी ते पाणी प्या. यामुळे पोटातील हानिकारक घटक मूत्रद्वारे बाहेर पडेल आणि आराम मिळेल.

३) केसर, शिलाजीत, मध आणि पाण्याचे सेवन केल्याने पोटातील सर्दी कमी होते. यासाठी पाण्यात उकळून उर्वरित साहित्य मिसळा आणि नंतर हे पाणी गाळून प्या. यात मध टाकून दिवसातून २-३ वेळा प्या.