| |

हाताचं मनगट दुखतंय?; जाणून घ्या कारणे आणि घरगुती उपाय

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असे होते कि आपण कुठेतरी पडतो, आपटतो आणि हे दुखणे आपल्याला थोड्या वेळानंतर जाणवते. पण हलके दुखणे किंवा मुक्का मार असेल असे म्हणून आपण याकडे दुर्लक्ष करतो आणि हेच पुढे अवघड दुखणे होऊन बसते. जसे कि, मनगटातील दुखणे. हे दुखणे अचानक लागलेला मुक्का मार किंवा फ्रॅक्चर यामुळे होऊ लागते. परंतु दीर्घकाळापर्यंत होणारा दबाव व इतर कारणेही या दुखण्याला कारणीभूत असू शकतात. चला तर जाणून घेऊयात हाताचे मनगट दुखण्याची कारणे आणि त्यावरील घरगुती उपाय. जेणेकरून या दुखण्यावर घरच्या घरी अगदी सोप्प्या पद्धतीने तुम्ही उपचार करू शकाल आणि यापासून सुटका मिळवालं.

० हाताचे मनगट दुखण्यामागील कारणे:

१) मुक्का मार बसणे – कधी कधी हाताच्या बाजूवर पडणे, आपटणे या घटनांमुळे मनगटात इजा होऊ शकते. अनेकदा हि इजा दिसून येत नाही. परंतु हि इजा आतपर्यंत झालेली असू शकते. यामध्ये चमक भरणे, मनगटातील तान आणि फ्रॅक्चर अश्या समस्या होतात.

२) मनगटावर येणारा दबाव – एखादे काम करताना मनगटावर दबाव पडणे हे मनगट दुखण्याचे प्रमुख कारण असू शकते. जसे अनेक लोकांना कॉम्प्युटरवर टायपिंग करण्याचे काम करावे लागते. यामुळे मनगटावर दबाव पडतो. परिणामी मनगटाचे हाड सरकणे वा सुज येणे ह्या समस्या निर्माण होतात.

३) उशाखाली हात घेऊन झोपणे – अनेकांना झोपताना उशाखाली हात घ्यायची सवय असते. या सवयीमुळे हाताच्या मनगटावर दाब पडतो आणि यामुळे स्नायू दुखावतात. परिणामी मनगट दुखायला लागते.

० इजेमूळे मनगट दुखत असेल तर खालील लक्षणे निर्माण होतात :-

१) वस्तू उचलण्यात त्रास होणे.

२) कमीत कमी वजन असलेली वस्तू थोडा वेळही धरता न येणे.

३) दुखावलेल्या मनगटाच्या हाताची बोटे जड वाटणे.

४) मनगट फिरवल्यावर कट कट आवाज येणे.

५) मनगटात सुज येणे.

६) मूठ बनवण्यात त्रास होणे.

मनगटातील दुखण्याचे सुरुवातीची लक्षणे हलकी असली तरीही काही काळानंतर ही समस्या बिकट होते. म्हणून या दुखण्यावर लवकरात लवकर घरगुती उपाय करावेत.

० मनगट दुखणे घरगुती उपाय :-

१) कॅल्शियमचे सेवन करा – हाडांना मजबूत करण्यासाठी शरीरात योग्य मात्रेत कॅलशिअम असावे लागते. साधारण ५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या वयस्करांनी आपल्या अन्नात १२०० मि.ग्रा.पर्यंत तर ५० पेक्षा कमी वय असणाऱ्या व्यक्तींनी १००० मि.ग्रा.पर्यंत कॅल्शियम घ्यावीत. यासाठी आहारात डाळी, पालेभाज्या, दूध, ताज्या फळांचा रस घ्यावा.

२) आलं – आळ्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे शरीराववरील सुज दूर करण्यास सक्षम असते. त्यामुळे मनगटाचे दुखणे वाढले तर आल्याचा चहा किंवा आल्याचा अर्क यांचे सेवन करावे. यासाठी १ वाटी आले मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याचा रस काढून घ्या आणि यात मध मिसळून सकाळ संध्याकाळ प्या.

३) लसूण – लसणीमध्ये सल्फर आणि सेलेनियम असते. जे सुज दूर करण्यास सक्षम असते. त्यामुळे मनगटाचे दुखणे दूर करण्यासाठी मोहरीच्या तेलात लसणाच्या काही पाकळ्या गरम करा आणि हे तेल कोमट करून संपूर्ण मनगटावर लावा. याने मनगटातील दुखणे दूर होईल.

४) आईस पॅक – बर्फ सुज उतरवण्यासाठी उपयोगी असतो. म्हणून मनगटात सूज असल्यास ती कमी करण्यासाठी आपले मनगट बर्फाने शेकु शकता.

५) झोपताना मनगट वरच्या बाजूला ठेवा – मनगटातील दुखण्याचा त्रास कायमस्वरूपी असेल तर झोपतांना मनगट शरीरापासून थोड्या उंचीवर ठेवा. यासाठी उशीचा वापर करता येईल. झोपताना हात आणि मनगट उशीवर ठेवा व मनगटाला जास्तीत जास्त आराम द्या.

६) बेल्ट वापरा – मनगटातील दुखणे दूर करण्यासाठी मनगटाचा बेल्ट वापरावा. जर आपल्याकडे बेल्ट नसेल तर रूमाल वा कपडादेखील बांधू शकता.