Does your child get very angry?

आपल्या मुलांना खूप प्रचंड राग येतो ना ?

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आपल्या घरात अशी एखादी तरी व्यक्ती असते . कि  काहीही बोलले तरी नाकावर लगेच राग येतो. समोरचा कोणत्या उद्देशातून बोलत आहे. असे काहीच समजून न घेता. पटकन उत्तरे देऊन रिकामे होतात. त्यामुळे समोरच्याची मने दि दुखावली जाऊ शकतात. याचे या लोकांना भानच नसते . त्यामुळे नातेसंबंधात खूप जास्त प्रमाणात तणाव यायला सुरुवात होते. एकमेकांचा आदर करून नातेसंबंध वाढवण्याचा प्रयत्न करा . जर रागाचे प्रमाण हे जास्त असेल तर अश्या वेळी आपण कसे रिऍक्ट करणे आवश्यक आहे .

नेहा खूप हुशार होती . ती तिच्या आईवडिलांची प्रत्येक गोष्ट ऐकायची. पण ठराविक काळानंतर ती आई वडिलांना मान देणे त्यांचा आदर करणे या गोष्टी विसरून गेली होती . तिचे आई वडील खूप साधारण परिस्थितले होते . आई एका शाळेत कमी करत होती तर तिचे वडील हे एका शाळेवर शिपाई म्हणून काम करते होते . आपल्याला एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या प्रत्येक गोष्टीत लाड होत गेला. तिला कोणत्याही गोष्टीसाठी कमी पडू दिले नाही. पण आजकल तिचे वागणे आणि बोलणे यामध्ये खूप फरक झालेला पाहायला मिळत आहे . त्यामुळे तिचे आई बाबा दोघेही तणावात आहेत .

तिच्यावर झालेल्या समुपदेशनातून हे लक्षात आले कि , तिला ज्या शाळेत टाकले गेले होते . त्या शाळेतील तिच्या सर्व मैत्रिणी या उच्चं घरातून येत होत्या . त्यामुळे त्या मुलींच्या सहवासात राहून ती त्यांच्यासारख्या अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिच्या राहणीमानात अनेक बदल झालेले दिसून येतात. कधी कधी ती तिला एखादी गोष्ट मिळाली नसेल तर ती त्या गोष्टींसाठी आई वडिलांना उलट बोलायला सुद्धा कमी करत नाही. अश्या वेळी तिच्यावर समुपदेशन करण्यात आले. आणि ती किती चुकीची आहे . हे तिला भासवून देण्यात आले . गरीब घरात जन्माला आले याचा अर्थ असा नाही कि , आई वडिलांनी तुझ्या साऱ्या हौस मौस या पूर्ण केल्या गेल्या पाहिजेत . तुझ्याही प्रति त्याच्यासाठी काही तरी करण्याचे कर्तव्य आहे. अनेक चुकीच्या गोष्टींबाबत तिला माहिती दिल्याने तिच्यामध्ये खूप बदल दिसून यायला सुरुवात झाली .