|

योगा केल्याने टळू शकतो हृदयविकाराचा धोका; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एका अंदाजानुसार जगातील ४२ कोटींपेक्षा जास्त लोक मधुमेह या आजाराचे बळी आहेत. याला डायबिटीज आणि शुगर देखील म्हणतात. हा आजार चुकीची जीवनपद्धती आणि अत्यधिक जंक फूड खाण्यामुळे होतो. अनेकदा हा आजार अति काळजी किंवा निद्रानाश यांमुळेदेखील होतो. शिवाय मधुमेह असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका अत्याधिक संभवतो. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, योगा नित्य नियमाने केलात तर हा धोका टळू शकतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशी काई योगासने सांगणार आहोत, जी दररोज केल्याने आपल्या आरोग्यास फायदेशीर ठरू शकते.

padmasana

१) पद्मासन – पद्मासन करतेवेळी असं अवस्थेत बसून, उजव्या हाताचा तळवा प्रथम नाभीवर आणि डाव्या हाताचा तळवा उजव्या हातावर ठेवा. मग श्वास सोडताना पुढे वाकून हनुवटी जमिनीवर टेकवा.दरम्यान आपली नजर समोर ठेवा. पुन्हा एकदा श्वास घ्या आणि परत सोडा. हे असे ४ ते ५ वेळा करा.

padmasana

या व्यतिरिक्त पद्मासनात बसून दोन्ही हात पाठीमागे घेऊन डाव्या हाताचे मनगट उजव्या हाताने धरून घ्या. यानंतर श्वास बाहेर सोडताना हनुवटीचा जमिनीला स्पर्श करा. दरम्यान नजर समोर ठेवा. जर हनुवटी जमिनीला स्पर्श करत नसेल तर शक्य तितके पुढे वाका.

Kurmasana

२) कुर्मासन – या आसनाचा अवलंब करतेवेळी, आधी वज्रासन अवस्थेत बसा. यानंतर दोन्ही कोपर नाभीच्या दोन्ही बाजूला ठेवून तळहात एकत्र सरळ वरच्या दिशेने न्या. पुढे श्वास सोडताना समोर वाकून हनुवटी जमिनीवर टेकवा. दरम्यान नजर समोर ठेवा. या स्थितीत काही काळ राहिल्यानंतर, इनहेलिंग करा.

Kurmasana

या व्यतिरिक्त, दंडसानाच्या स्थितीत बसून दोन्ही गुडघे किंचित उभे करा आणि कंबर वाकवून दोन्ही हात गुडघ्याखाली ठेवून मागील दिशेने करा. या स्थितीत, दोन्ही हातांच्या भुजा गुडघ्यांना स्पर्श करतील आणि तळवे मागे जमिनीवर राहतील याची काळजी घ्या. यानंतर हळूहळू हनुवटी जमिनीस स्पर्श करा. सोयीनुसार काही काळ असे राहिल्या नंतर परत मूळ स्थितीत या.

३) पवनमुक्तासन – हे असं करण्याकरिता, प्रथम शवासन अवस्थेत निपचित पडा. पुढे दोन्ही पाय एकमेकांजवळ आणा आणि हात कंबरेला चिकटून घ्या. मग गुडघे वाकवून तळपाय जमिनीवर टेकवा. यानंतर हळूहळू दोन्ही बाजूने आपले गुडघे छातीजवळ न्या आणि हातांची कात्री बनवून गुडघे धरा. दरम्यान श्वास बाहेर सोडताना डोक जमिनीच्या वर उंच करा आणि गुडघ्यांना हनुवटी लावण्याचा प्रयत्न करा.

Pawanmuktasan

सोयीनुसार हाताच्या कात्रीने छातीच्या दिशेकडे गुडघे दाबा. सुमारे १० ते २० सेकंदापर्यंत श्वास रोखून या स्थितीत रहा आणि पुन्हा परत येण्यासाठी प्रथम डोके जमिनीवर टेकवा. मग हातांची कात्री उघडा आणि आपले हात जमिनीवर ठेवा. त्यानंतर पुन्हा पाय जमिनीवर ठेवून शवासन स्थितीत परत या.

४) मंडूकासन – हे असं करण्यासाठी, सर्वप्रथम दंडासन अवस्थेत बसताना वज्रासनात बसून दोन्ही हातांच्या मूठ बंद करा. दरम्यान मुठ बंद करतेवेळी आपल्या बोटांनी अंगठा आत दाबा. मग दोन्ही मुठी नाभीच्या दोन्ही बाजूस ठेवा आणि श्वास सोडताना हनुवटी समोर वाकवून जमिनीवर ठेवा. या स्थितीत काही काळ राहिल्यानंतर पुन्हा वज्रासनात परत या.

Mandukasana

५) उत्तान पादासन – या आसनाचा अवलंब करताना आधी आपल्या पाठीवर जमिनीवर झोपा. पुढे दोन्ही हात मांड्यांसह जमिनीस स्पर्श करा आणि दोन्ही पायांचे गुडघे, पायाची बोटं, अंगठा जवळ ठेवून पाय ताणून ठेवा. आता, श्वास घेताना दोन्ही पाय जोडून हळूहळू जमिनीपासून दीड फूट उंच करा, म्हणजे ४५डिग्री कोन तयार होईपर्यंत त्यास उंच करून ठेवा. नंतर जोपर्यंत आपण सहज श्वास रोखू शकता तोपर्यंत पाय वर ठेवा. त्यानंतर हळूहळू श्वास बाहेर सोडताना पाय खाली आणा आणि त्यांना हळू हळू जमिनीवर ठेवून शरीर सैल सोडून शवासन करा.

Uttanpadasana

* आसनांचे फायदे : वरील सर्व योग मुद्रा स्वादुपिंडाचे कार्य सक्रिय करतात. यामुळे मधुमेह कमी करण्यास मदत होते. शिवाय या आसनांचा सराव हा पोटासाठी चांगला व्यायाम आहे. याने जठराची सूज प्रज्वलित होते आणि गॅस, अपचन, बद्धकोष्ठता सारख्या पोटाच्या आजारांचा नाश होतो.

* लक्षात ठेवा :

– वरील सर्व आसने करतेवेळी आपली क्षमता लक्षात घ्या. हि आसने सर्व साधारण क्षमतेनुसार किमान १ ते २ मिनिटे केली पाहिजेत आणि केवळ ३ ते ५ वेळा पुनरावृत्ती करावी.

– रात्री जेवणानंतर १६ तास उपवास केल्याने मधुमेहावर नियंत्रण राखता येते. शिवाय सकाळी चहा, दूध किंवा इतर कोणतेही पदार्थ घेऊ नका. फक्त गरम पाणी, ग्रीन टी किंवा नारळ पाणी पिण्याची सवय लावून प्या.