| |

गरोदरपणात जंक फूड नकोच, कारण..; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यात गरोदरपण हा एक अनोखा, सुखद आणि तितकाच नाजूक काळ असतो. या काळात प्रत्येक स्त्री एका वेगळ्या अनुभवातून जात असते. करंट ती तिच्या गर्भात स्वतःच बाळ वाढवत असते. त्यामुळे तिचा संपूर्ण लक्ष हा बाळाची वाढ आणि विकासावर असतो. त्यामुळे तिला स्वतःच्या शारीरिक आणि मानसिकरित्या होणाऱ्या प्रत्येक बदलांना आपलेसे करावे लागते. अनेक गोष्टींचे पालन अगदी काटेकोररित्या करावे लागते. निश्चितच गरोदरपणापूर्वी स्त्रिया आपले आवडीचे कोणतेही पदार्थ खाऊ शकतात. मात्र गरोदरपणात आहारात बदल करावे लागतात. या दरम्यान बर्गर, पिझ्झा, फ्रेंज फ्राईज याशिवाय कोक व अन्य शीतपेये असे बाहेरचे जंक फूड व अन्य पदार्थ खाणे जाणीवपूर्वक टाळावे लागते. गरोदरपणात महिलेच्या शरीराला अधिक पोषणाची गरज असते. कारण बाळाची वाढ आणि विकास तिच्या पोटातच होत असतो. त्यामुळे आई जे काही खाली तेच बाळाच्या विकासासाठी मदत करते हे लक्षात ठेवून आहार घेणे गरजेचे असते. यासाठीच जाणून घ्या गरोदरपणात जंक फूड का खाऊ नये खालीलप्रमाणे:-

१) बाळाच्या विकासावर परिणाम
– जंक फूडमधून आईच्या शरीराला कोणतेही पोषक घटक मिळत नाहीत. ज्यामुळे बाळाचा मेंदू, ह्रदय, फुफ्फुसे, हाडे यांच्या विकासात अडथळा निर्माण होतो. त्याचप्रमाणे बाळ जन्मापासून अधु वा अशक्त होण्याचा धोका वाढतो. यासाठी गर्भारपणात जाणीवपूर्वक जंकफूड खाणे टाळावे.

२) रक्तदाबावर अनियंत्रित
– गरोदरपणात महिलांच्या रक्तदाबावर परिणाम झाला तर समस्या दुप्पटीने वाढतात. यासाठी गर्भारपणात रक्तदाब नियंत्रित असणे गरजेचे असते. मात्र अती प्रमाणात जंकफूडचे सेवन केल्यास महिलांचा रक्तदाब अनियंत्रित होऊ शकतो. सतत रक्तदाबाची स्थिती वर खाली होण्यामुळे महिलांना छातीत दुखणे, ह्रदयाच्या समस्या होऊ शकतात. जे गर्भात वाढणाऱ्या बाळासाठी योग्य नाही.

३) अॅलर्जी होऊ शकते
– गर्भारपणात बाळाची वाढ व विकास योग्य रीतीने झाली नाही तर बाळाच्या मेंदूवर परिणाम होतो. या शिवाय जंक फूड खाण्यामुळे मातेस कोणतीही अॅलर्जी झाली तर ती पटकन पसरते. अशा बाळाला जन्मानंतर अस्थमा सारख्या श्वसनविषयक समस्या होऊ शकतात. यासाठीच गर्भारपणात मातेने जंक फूड खाऊ नये.

४) वजन अनियंत्रित होते
– जंकफूडमध्ये फॅटचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे असे पदार्थ खाण्याने वजन नियंत्रणात राहत नाही. मात्र गर्भावस्थेत असे वजन वाढले तर त्याचा परिणाम थेट बाळाच्या विकासावर होतो. मुळातच या काळात मतांचे वजन वाढलेले असते. त्यामुळे अती वजन बाळंतपणात त्रासदायक ठरू शकते.

५) जेस्टेशनल डायबिटीज होऊ शकतो
– गरोदरपणाच्या काळात मधुमेह होण्याचा धोका असतो. या मधुमेहाला ‘जेस्टेशनल मधुमेह’ म्हणतात. हा मधुमेह फक्त गरोदरपणात असतो नंतर कमी होतो. मात्र यामुळे बाळाची वाढ आणि मातेची प्रकृती दोन्हीवर परिणाम होतात. जंकफूडमधील अतिरिक्त कॅलरिज आणि साखर गर्भवती महिलांचे वजन वाढवते. यासाठी गर्भारपणात जंकफूड खाणे योग्य नाही.