cardamom

रोज रात्री झोपताना एक इलायची आणि गरम पाणी घ्यायला नका विसरू

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अपल्या आहारात इलायची खूप जास्त लाभकारी आहे. इलायची ही जास्त करून आपल्या चहासाठी वापरले जाते. इलायची चे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत. त्याचा आहारात वापर केल्याने आपल्या प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते.  तसेच त्याचे असलेले औषधी गुणधर्म हे फार प्रभावी आहेत.  त्यामुळे आजीबाईच्या बटव्यामध्ये  इलायची चा  समावेश  केला गेला आहे.  इलायची जे  काही औषधी गुणधर्म जाणून घेण्याचा प्रयत्न करूया …

इलायची ही जास्त करू सर्दी, खोकला, मूळव्याध , लघवी मध्ये होणाऱ्या जळजळ साठी सुद्धा इलायची खूप जास्त प्रभावी असते. त्यामुळे आपल्याला पोटाच्या समस्या या जास्त प्रमाणात निर्माण होत नाहीत. आपण आपल्या आहारात जर दररोज एक इलायची ठेवली तर मात्र तोंडच्या ज्या काही समस्या असतील त्या दूर होण्यास मदत होते . सकाळी उठल्या उठल्या दररोज इलायची चा चहा घेतला तर आपल्याला फ्रेश वाटायला सुरुवात होते. कधीही फक्त कोरडी इलायची खाण्यापेक्षा त्यानंतर एक ग्लास पाणी पिल्याने त्याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे होतात.

इलायची हि हृदय आणि गळ्याला आराम देते. हृदय बलवान करते. उलटी आणि जीव घाबरणे थांबवते. आपल्या शरीराला असलेले स्टोन चा प्रॉब्लेम कमी करण्याचे काम स्टो इलायची करते. कावीळ, अपचन, मूत्रविकार, छातीमध्ये जळजळ, पोट दुखी, गुचकी लागणे आणि सांधेदुखी यामध्ये इलायची सेवन केल्याने फायदा मिळतो. जर तुमचे पोट बाहेर निघाले असेल तर आणि तुम्हाला परत ते आतमध्ये घ्यायचे असेल तर रात्री 2 इलायची खाऊन गरम पाणी प्यावे. यामध्ये पोटेशियम, मैग्नीशियम, बिटामिन बी ६ आणि बी २ हे व्हिटॅमिन आपल्याला मिळतात. केस गळणे पूर्णतः बंद होते. तसेच शरीरातील रक्तभिसरण क्रिया हि व्यवस्थित होण्यास मदत करते.