| |

काखेतला काळसरपणा लपवू नका, उलट घरच्या घरी उपाय करून सुटका मिळवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। गुप्तांगात काळसरपणा असणे हि समस्या कुणा एकाची नसून अनेको स्त्रियांची आणि अगदी पुरुषांची सुद्धा आहे. खास करून अंडर आर्म्स अर्थात काखेतील काळसरपणा हि सगळ्यात मोठी समस्या आहे. अहो इतकेच काय तर अनेको स्त्रिया केवळ काखेतील काळसरपणा बाहेर दिसू नये म्हणून स्लिव्हलेस कपडे घालणे अक्षरशः टाळतात. इतकेच नव्हे तर काख स्वच्छ ठेवण्यासाठी अनेकजण बाजारातून विविध ब्रॅण्डची महाग सौंदर्य उत्पादने खरेदी करतात आणि त्यांचा वापर करतात. पण होते असे कि, हे महागडे प्रॉडक्ट्स वापरूनही त्यांना योग्य परिणाम मिळत नाहीत आणि यानंतर भ्रमनिरास होऊन हे लोक केवळ बाहेरच्या लोकांपासून हि समस्या लपविण्याचा प्रयत्न करत राहतात. पण आता काखेतला काळसरपणा लावपायची गरज पडणार नाही. कारण आम्ही तुम्हाला असे काही सोप्पे आणि घरच्या घरी करता येतील असे उपाय सांगणार आहोत, ज्यांच्या वापराने तुम्ही अगदि कमी काळात या समस्यांपासून सुटका मिळवू शकाल. चला तर जाणून घेऊयात काखेतील काळसरपणा दूर करण्यासाठीचे उपाय खालीलप्रमाणे:-

१) बटाट्याचा वापर
– घराघरात अगदी सहज आढळणारा बटाटा आपल्या त्वचेसाठीही अत्यंत फायदेशीर असतो. मुळात बटाटे अम्लीय असतात. ज्यामुळे त्यात नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आढळतात. यांचा वापर काली पडलेली त्वचा उजळ करण्यासाठी वापरता येते. म्हणून काखेतील काळसरपणा दूर करण्यासाठी एक बटाटा अर्धा कापून काखेत चोळावा. असे आठवडाभर रोज केल्याने लवकर फायदा होतो. याशिवाय बटाट्याचा रस काढा आणि तो गाळून घ्या. त्यानंतर यात कापसाचा बोळा पूर्ण बुडवा आणि काखेत व्यवस्थित लावा. पुढे ते कोरडे होऊ द्या आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने धुवा.

२) काकडीचा वापर
– काकडीचा वापर आपल्या शारीरिक आरोग्यासाठी जितका फायदेशीर आहे तितकाच आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठीही लाभदायक आहे. कारण काकडीमध्ये नैसर्गिक ब्लीचिंग एजंट्स असतात. जे काळी त्वचा स्वच्छ करू शकतात. त्यामुळे काखेतील काळसरपणा दूर करण्यासाठी काकडी प्रभावी आहे. काकडी किसून घ्या किंवा मिक्समध्ये बारीक करा. नंतर याचा रस गाळून घ्या. आता कापसाचा बोळा रसात बुडवा आणि आपल्या काळ्या झालेल्या काखेच्या भागावर दररोज लावा. असे रोज केल्याने केवळ काळपटपणा दूर होत नाही, तर काखेतील दुर्गंधीची समस्यादेखील दूर होते.

३) लिंबू – लिंबामध्ये नैसर्गिक ब्लीचिंग घटक असतात. जे काखेतील काळे डाग काढून टाकण्यास मदत करते. यासाठी एक लिंबू कापून काखेवर काही मिनिटांसाठी मालिश करा. असे आठवड्यातून २ वेळा करा. याशिवाय लिंबाच्या रसामध्ये थोडी हळद पावडर घालून देखील वापरू शकता. या उपायामुळे नैसर्गिकरित्या काखेतील काळसरपणा काढून टाकण्यास मदत होते.