हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा असं होत कि कुणी समोर आलं तर न जाणे आपण काय काय बोलू आणि काय काय करू… किंवा अनेकदा आपल्याला समोरच्या व्यक्तीवर चिडायचेही नसते आणि त्या व्यक्तीला दुखवायचेही नसते. पण का कुणास ठाऊक आपण त्याच व्यक्तीला अद्वातद्वा बोलतो, त्याच व्यक्तीवर राग काढतो आणि मग काय? पश्चताप करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का? कि हि चिडचिड, विनाकारण रागरूसवे आपल्या कंट्रोल बाहेर का असतात? कधीकधी तर अख्ख जग नकोस वाटत इतका राग अनावर होतो. पण या चिडचिड करण्यामागचे मूळ कारण समजण्यापलीकडे का असते?
तर मित्रहो, चिडचिड होण्यामागे अनेको कारणं असतात फक्त ती आपल्याला समजत नाहीत. यातली काही करणे तर अगदी कुणालाही समजतील अशी असतात पण तरीही आपल्या समजेपलीकडे असतात. आता तुम्ही म्हणाल नेमकं काय?? तर याचे उत्तर असे कि आम्ही तुम्हाला ती कारणं सांगणार आहोत ज्यामुळे स्वभावात चिडचिड निर्माण होते.
१) सकाळचा नाश्ता न करणे.
– सकाळी नाश्ता केल्यामुळे शरीरात दिवसभर ऊर्जा मिळते. पण जे लोक सकाळी नाश्ता करत नाहीत, त्यांचे शरीर ऊर्जा साठवून ठेवण्यास सक्षम नसते. शिवाय त्यांच्या शरीरात पोषक घटकांची कमतरता झाल्यामुळे शरीर आतून कमकुवत होते. परिणामी त्यांच्या स्वभावात राग आणि चिडचिड जास्त होते.
२) अति गोड खाणे.
– काही लोकांना गोड खाणे अतिशय प्रिय असते. पण जास्त साखर खाल्याने मेंदूचे कार्य अस्थिर होते. वास्तविक जास्त साखर खाल्ल्याने शरीरातील सूक्ष्म पोषक घटकांसह प्रथिने शोषण्याची प्रक्रिया मंदावते, ज्यामुळे मेंदूवर विपरीत परिणाम होतो. यामुळे शारीरिक थकवा, संताप आणि चिडचिड वाढते.
३) झोपेचा अभाव
– झोपेचा अभाव अनेक आजार ओढून आणतो. कारण शरीर निरोगी राहण्यासाठी ८ – ९ तासांची झोप आवश्यक आहे. पण जर शरीराला पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्या व्यक्तीला शारीरिक थकवा, डोकेदुखी आणि तणाव यांसारख्या समस्या उदभवतात. परिणामी चिडचिड वाढते.
४) डोके झाकून झोपणे.
– अनेकांना डोकं किंवा तोंड झाकून झोपायची सवय असते. हि सवय मानसिक आरोग्यास हानी पोहचवते. कारण डोके झाकून झोपल्याने मेंदूच्या पेशींची वाढ थांबते आणि ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. शिवाय या सवयीमुळे मेंदूची चालना शमते आणि मानसिक ताण आल्यामुळे चिडचिड वाढते.
५) संयमाचा अभाव.
– आजकाल कित्येक लोकांची मोठी समस्या म्हणजे, संयमाचा अभाव आणि हीच समस्या अत्यंत गंभीर आहे. छोट्या छोट्या गोष्टींवर ओव्हररिएक्शन देत अनेकवेळा हे लोक चुका करतात आणि नंतर पश्चात्ताप करतात. यामुळे मूड खराब होतो आणि राग येतो. परिणामी चिडचिड वाढते.