| | |

हिवाळ्यात वेट गेन नको? मग आहारात ‘या’ भाज्या हव्याच; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आता पावसाळ्याचे दिवस सरतीवर आले आणि हुवाल्याच्या गुलाबी थंडीची चाहूल लागते आहे. एकदा का ऑक्टोबर हिट सरली का मग हिवाळा सुरु. पण टेन्शनची गोष्ट म्हणजे थंडीच्या दिवसांमध्ये वजन कमी करणे अतिशय कठीण होऊन बसते. याचं कारण म्हणजे, हिवाळ्यात भूक जास्त लागते आणि आळस अधिक वाढतो. यामुळे लोक वर्कआउट कमी करतात आणि अंथरुणात जास्त लोळतात. परिणामी वजन अगदी झपाट्याने वाढते. मग हे वजन वाढू नये म्हणून काय करायचे असा एक सवाल उपस्थित होतो. तर हिवाळ्यात आहारात काही भाज्यांचा समावेश केला असता वजन वाढण्याची शक्यता कमी होते. म्हणूनच आज आपण या भाज्यांविषयी जाणून घेणार आहोत.

१) पालक – आपण सारेच जाणतो कि पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात हिरवागार पालक हा वजन कमी करण्यासाठी लाभदायक मानला जातो. केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठीदेखील पालक मदत करतो. याशिवाय पालकांमध्ये असलेले मॅग्नेशियम, लोह, जीवनसत्त्वे अ, क आणि के सारखी पोषक तत्त्वे हिवाळ्यात आपले आरोग्य राखण्यात सक्षम भूमिका बजावतात.

२) मुळा – पांढराशुभ्र मुळा खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण मुळ्यातील पोषक घटक आपल्या शरीराला सर्व प्रकारचे फायदे देतात. तर मुळ्यातील फायबर वजन कमी करण्यासाठी मदत करते. शिवाय मुळा खाल्ल्याने बराच वेळ पोट भरलेले राहते आणि भूक लागत नाही. ज्यामुळे पुन्हा पुन्हा थोडे थोडे करत नको तेवढे खाण्याची सवय टाळली जाते.

३) मटार – वजन कमी करण्यासाठी मटार मदत करतात. कारण मटारमध्ये चरबीचे प्रमाण अत्यल्प असते. तसेच, कोलेस्टेरॉल देखील ०% आहे. तर मटारमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे. यामुळे हिवाळ्यात आपण आहारात मटार असतील तर वजन वाढण्याची भीती वाटत नाही.

४) गाजर – गाजर वजन कमी करण्यात मदत करते. इतकेच नव्हे तर गाजर खाल्ल्यामुळे डोळ्यांचे आरोग्यदेखील सुधारते. मुख्य म्हणजे, गाजर चरबी जाळण्यास सक्षम असते यात फायबरदेखील भरपूर प्रमाणात आढळतात. याशिवाय गाजर पचनक्रिया सुधारण्यास मदत करते.

५) बीट – बीट खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. शिवाय बीट खाल्ल्याने शरीरातील रक्त वेगाने वाढते. याशिवाय बीटात आढळणारे पोषक घटक आरोग्यास इतरही अनेक फायदे देतात. तसेच बीटात लोह, मॅग्नेशियम आणि अनेक प्रकारचे जीवनसत्त्वे असतात जे वजन कमी करण्यास सहाय्यक असतात.

६) याशिवाय हिवाळ्यात वजन वाढू नये म्हणून मिक्स व्हेज वा फ्रुट सॅलड, भाज्यांचे सूप, विविध फळांचे ज्यूस, हिरव्या भाज्या, दुधी/गाजर हलवा आणि भरलेले पराठा अशा विविध पदार्थांच्या स्वरूपात स्नॅक्स एन्जॉय करता येतील.