| |

फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक वेळ वाचवते पण आरोग्याचं काय?; जाणून घ्या तोटे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अख्खा दिवस दमून भागून जेवणाच्या ताटावर बसलं कि ताटात सर्वांत सुखदायी काय असेल तर ते म्हणजे गरमागरम पोळी. कधी कधी गृहिणी वेळ वाचवण्यासाठी दिवसातून एकदाच पोळ्यांसाठी लागणारी कणीक हवी तितक्या प्रमाणात मळून ठेवतात. मग उरलेली कणिक झाकून फ्रिजमध्ये ठेवून देतात. पण हि सवय आपल्या आरोग्यासाठी अतिशय नुकसानदायक ठरू शकते, हे आपण जाणता का? तुमची ही एक सवय तुमच्यासह कुटुंबातील प्रत्येकाच्या आरोग्यासाठी हानीकारक आहे. हे मान्य कि, तुमचा वेळ वाचतो पण आरोग्याचे मात्र चांगलेच नुकसान होते. म्हणून आम्ही तुम्हाला याबाबतचे तोटे सांगणार आहोत. चला जाणून घेऊया फ्रिजमध्ये ठेवलेली कणीक आरोग्याला कशाप्रकारे अपायकारक असते.

० आरोग्य विशेष तज्ञांच्या मतांनुसार, ताज्या कणकेच्या पोळ्या करून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. कारण मळलेली कणीक फ्रिजमध्ये ठेवल्यावर फ्रिजमधील हानीकारक किरणांमुळे कणकेतील पोषक तत्त्व पूर्णतः नष्ट होतात. यामुळे आरोग्यास हानी होऊ शकते. शिवाय कणकेने बनवलेल्या पोळ्या चवीलाही निकृष्ट लागतात.

० तर आयुर्वेद अभ्यासानुसार, एकदा मळलेली कणीक दुसऱ्यांदा वापरल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य अस्थिर होते. एकवेळ तुम्ही शिळ्या पोळ्या खाल्ल्या तरी चालेल पण फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेचा वापर करू नये. यामुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते.

० शिवाय वेद शास्त्रांनुसार, शिळ्या कणकेपासून बनवलेल्या पोळ्यांना ‘भूत भोजन’ असे म्हटले जाते. असे म्हणतात की, हे जेवण जेवणाऱ्या व्यक्तीचे आयुष्य नेहमी रोग आणि आरोग्याशी संबंधित विविध समस्यांनी घेरलेले असते. तसेच शिळ्या कणकेच्या पोळ्यांचा जेवणात समावेश केल्यास लोक आळशी आणि त्याहून अधिक रागीट, चिडचिडी होतात.

० शिळ्या कणीकेच्या पोळ्या खाल्ल्यामुळे गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठता यांसारखे आजार आपल्या शरीरात कायमचे घर करून बसतात.

  • लक्षात ठेवा – कोणताही पदार्थ ताजा असतेवेळी खाल्ल्यास त्यातील जीवनसत्त्व शरीरास प्राप्त होतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. पण फ्रिजमध्ये ठेवून किंवा शिळे झालेले अन्न खाल्ल्यास त्यातील आरोग्यदायी घटकांचा नाश होतो. याचे गंभीर परिणाम शरीराला भोगावे लागतात. म्हणून, जेवण आणि इतर खाद्यपदार्थ ताजे असतानाच त्यांचा आस्वाद घ्या.