| | |

लिचीसारखे दिसणारे ‘ड्रॅगन आय’ फ्रुट गंभीर आजारांवर गुणकारी; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। लाँगान फळ हे लीचीसारखे दिसणारे फळ आहे. परंतु आरोग्यविषयक फायद्याविषयी म्हणाल तर हे लिचीपेक्षा फायदेशीर आहे. हे फळ प्रामुख्याने चीन, तैवान आणि मलेशिया या देशांमध्ये पिकवले जाते आणि औषधे तयार करण्यासाठी व सौंदर्य वाढविण्यासाठी वापरले जाते. लाँगानला चिनी भाषेत ‘ड्रॅगन आय’ असेही म्हणतात. लाँगान फळ हा पोटॅशियमचा खजिना आहे. जो रक्तदाब नियमित करण्यास मदत करतो. याशिवाय लाँगानमध्ये प्रथिने आणि व्हिटॅमिन-सी सारखे घटक समाविष्ट आहेत. हे लाँगान फळं मेंदूची आकलन क्षमता, पचनक्रिया आणि रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रभावी आहे. चला तर मग जाणून घेऊया लाँगान फळाविषयी इतर माहिती आणि फायदे –

१) रोग प्रतिकारशक्तीत वाढ – लाँगान हे फळ व्हिटॅमिन C चा उत्तम स्रोत आहे. तसेच यात अँटी-इंफ्लेमेटरी, अँटीऑक्सिडंट, अँटीवायरल आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारे घटक आहेत. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

२) रक्तदाब नियंत्रित – लाँगान पोटॅशियमचा खजिना आहे. यामुळे रक्तदाब नियमित करण्यास हे फळ मदत करते. वास्तविक, पोटॅशियम रक्तवाहिन्यांमधील तणाव कमी करते आणि रक्तदाब कमी करण्यास उपयुक्त ठरते.

३) पचन शक्तीत सुधार – लाँगान फळातील फायबर पचनशक्ती वाढवते आणि बद्धकोष्ठता, अतिसार आणि पोटाच्या पेटांसारख्या आजारांपासून मुक्तता देते.

४) लैंगिक समस्या निवारण – पारंपारिक चिनी औषधीत लाँगन हे फळ एखादे लैंगिक टॉनिक असल्याप्रमाणे वापरले जाते. कारण या फळाचे सेवन केल्यास कोणत्याही लैंगिक समस्या दूर होतात आणि पुरुष असो वा स्त्री दोघांमध्येही सेक्सची इच्छा वाढते.

५) कर्करोगाचा धोका कमी – लाँगान फळ कर्क रोगासारख्या जीवघेण्या आजारांपासून बचाव करण्यासाठी उपयुक्त आहे. कारण यात कर्करोगास प्रतिबंध करणारे विरोधी घटक असतात.

६) शारीरिक दाह कमी – लाँगान फळात अँटीऑक्सिडेंट भरपूर असते. यामुळे हे सूज कमी करण्यास मदत करते.याशिवाय शरीरातील दाह कमी करून जखमा लवकर बऱ्या होण्यास मदत करते.

७) जुनाट आजार छू – लाँगनमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडेंट गुणधर्म शरीरातील अश्या पेशींशी लढते ज्या शरीरातील इतर पेशी खराब करतात व ज्यामुळे दीर्घकालीन आजार होतात. यामुळे अश्या पेशींशी लढण्यासाठी हे फळ मदत करते आणि पेशींचे नुकसान होण्याचा धोका कमी होतो.

८) निद्रानाश दूर करते – निद्रानाशाची समस्या असेल तर लाँगान फळ आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज लाँगान फळ खाल्ल्यामुळे झोपेची समस्या दूर होते आणि झोपेचा कालावधीही वाढतो.

९) वजन कमी करते – लाँगान फळात कमी कॅलरी आणि कार्ब असतात. तसेच यात चरबीचे प्रमाण शून्य असते. यामुळे हे वजन कमी करण्यास देखील मदत करते.