| |

सुके अंजीर खाणाऱ्याला आरोग्याची चिंता कशाला; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण सारेच जाणतो कि आरोग्यासाठी फळे किती महत्वाची आहेत. कारण फळांमध्ये ते सर्व घटक समाविष्ट असतात जे निरोगी आरोग्यासाठी मदत करतात. तसे पाहाल तर फळं चवीने स्वादिष्टच असतात. पण काही फळे अशीही असतात जी सुकल्यानंतर अधिक चविष्ट आणि आरोग्यासाठी गुणकारी असतात. यांपैकी एक फळ म्हणजे सुकलेले अंजीर. हे एक ड्रायफ्रूट आहे. अंजीर सुकवण्याआधीही चविष्ट आणि सुकवल्यानंतरदेखील स्वादिष्ट लागतात. अंजीरच्या झाडाची साल पांढऱ्या रंगाची असते. हे झाड मुख्यतः सुक्या आणि ऊन असलेल्या जागी वाढते. या झाडाची उंची ७ ते १० मीटर इतकी असते. अंजीर शरीरासाठी अत्यंत लाभदायक असते. बद्धकोष्ठता, सर्दी, खोकला आणि श्वसनसंबंधी रोगांमध्ये हे फळ लाभकारी भूमिका दर्शविते. चला तर जाणून घेऊयात सुके अंजीर खाण्याचे फायदे :-

पचन आणि बद्धकोष्टतेसाठी फायदेशीर – अंजीर चे सेवन पचन तंत्राला अधिक सशक्त करते. अंजीर च्या नियमित सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्या दूर करता येते. पचन संस्था सशक्त करण्यासाठी रात्री झोपण्याआधी दोन-तीन अंजीर पाण्यात भिजून ठेवावे व सकाळी दूध अथवा मध सोबत खावे. पचन तंत्र मजबूत करून बद्धकोष्ठता दूर करण्यासाठी शरीरात फायबर ची आवश्यकता असते. अंजीर मध्ये प्रचुर प्रमाणात फायबर असते. अंजीर मध्ये असलेले फायबर शरीरातील मल एकत्र करून शरीरा बाहेर काढण्याचे काम करते.

१) हाडांसाठी संरक्षक – अंजीरमध्ये कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम अधिक असते. जे हाडांना मजबूत करण्यास सहाय्यक भूमिका दर्शविते. अंजीरचे नियमित सेवन केल्यामुळे ऑस्टियोपोरोसिस सारख्या रोगांपासून संरक्षण मिळते.

२) हृदयाची काळजी – एका संशोधनानुसार, अंजीरचे सेवन हृदयासाठी लाभदायक असलेले लीपोप्रोटीन वाढवते. अंजीरमध्ये आढळणारा हा गुणधर्म हृदयातील जोखीम तयार करणाऱ्या नसांना नष्ट करतो आणि हृदयरोगाचा धोका टाळतो.

३) मूळव्याधीशी दोन हात – मुळव्याध एक गंभीर आणि अत्यंत त्रासदायक आजार आहे. या आजाराने पीडित व्यक्ती अंजीरच्या उपयोगाने पीडा कमी करू शकतो. यासाठी दररोज सकाळी रात्रभर पाण्यात भिजवलेले २ अंजीर खा. साधारण ८ ते १० दिवस हा उपाय नियमितपणे केल्याने मूळव्याधपासून आराम मिळतो.

४) पुरुषांसाठी लाभदायक – वैज्ञानिक संशोधनातून समोर आले आहे कि, अंजीरचे सेवन पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या वाढवतात. शिवाय सुकलेले अंजीर खाल्ल्याने स्त्रियांचे प्रजनन स्वास्थ्य सुधारते. परंतु गंभीर समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

० काही टिप्स :-

१) अंजीर जसेच्या तसे खाता येते. परंतु तुम्ही इच्छेनुसार त्याच्यावरील आवरण काढून खाऊ शकता.

२) अंजीर सॅंडविच,सलाड किंवा असेव्ही खाल्ले जाऊ शकते. अंजीर टाकल्याने सलाडचा स्वाद वाढतो आणि शरीराला आवश्यक पोषक तत्व देखील मिळतात.

३) अंजीर केक, पुडिंग, जॅम, मिल्क शेक इ. स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी वापरले जाते. यामुळे इतर पदार्थांचे पोषणमूल्य वाढते.

४) सुकलेले अंजीर सूपमध्ये टाकूनदेखील खाता येईल. लहान मुलांना कॉर्नफ्लेक्समध्ये घालून देता येईल.