Moong Pulses Water
| | |

मूगडाळीचं वाटीभर पाणी दररोज प्या आणि झटपट करा वेटलॉस; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। विविध डाळींच्या प्रकारात मुगाची डाळ ही अधिक पौष्टिक आणि आरोग्यास फायदेशीर असते. कारण या डाळीमध्ये शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता असते. याशिवाय शरीरात ऊर्जा निर्माण करण्याचे काम देखील हि डाळ उत्तमरीत्या करते. तसेच मुगाच्या डाळीत प्रथिने, कर्बोदके आणि फॉस्फरस सारखे घटक असतात. त्यामुळेच मुगडाळ लहान मुलांच्या वाढीसाठीदेखील फायदेशीर आहे. त्यामुळे डॉक्टरसुद्धा लहान मुलांचा मूग डाळीचे पाणी पिण्याचा सल्ला देतात. आजकालची बदललेली जीवनशैली आणि आहारपद्धती यामुळे वजन झपाट्याने वाढते. यावर उत्तम उपाय म्हणून आपल्या आहारात मुगाच्या डाळीचं वाटीभर पाणी पिण्याला महत्त्व आहे. याचे कारण म्हणजे मुगाडाळीचं पाणी उत्तम डिटॉक्स उपाय असल्यामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. यामुळे शरीराला ताकद मिळते आणि वजन घटवण्यास फायदा होतो.

उकडलेल्या मूग डाळीचं पौष्टिक पाणी

जाणून घेऊया मुगाच्या डाळीचे पाणी पिण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

  1. मुगडाळीचं पाणी प्यायल्याने आपल्या शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढते. याशिवाय शरीरातील पारा, शीशे यासारखे जड धातू शरीरातून उत्सर्जित होऊन बाहेर पडतात.
  2. मुगडाळीच्या पाण्यातून आपल्या शरीराला आवश्यक असणारी तत्त्वे मिळतात. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि सोडियम यासह क जीवनसत्त्व, कर्बोदके आणि प्रथिने यांचा समावेश आहे.
  3. मुगडाळीचं गरम गरम पाणी एक वाटीभर घेऊन त्यात थोडं साजूक तूप घालून प्यायल्यास ते चवीस उत्तम लागतच. पण याशिवाय तुपाचेही सत्त्व त्यात उतरते आणि हे पाणी अधिक पौष्टिक होते. यामुळे शरीराचे पोषण दुपटीने होते.
  4. आपल्या नियमित आहारात मुगडाळीचं पाणी प्यायल्यास शरीरात जमा झालेले अशुध्द आणि विषारी घटक शरीरातून मलमूत्रावाटे बाहेर पडतात. यामुळे शरीर डिटॉक्स होते.
  5. मूगडाळीचे पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करते. यामुळे शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे जाणवणारी अस्वस्थता मुगडाळीचं पाणी प्यायल्याने दूर होते.
  6. दररोज मुगडाळीचं १ वाटी पाणी प्यायल्यास पोटाला आराम मिळतो. कारण मूगडाळीचे पाणी पचण्यास हलके असते. यामुळे पोटाला त्रास होत नाही.
  7. मूग डाळीचे पाणी प्यायल्याने वाढलेलं वजन कमी करण्यासाठी मदत होते. फक्त दररोज न चुकता मुगडाळीचं गरम पाणी प्या. यामुळे शरीरात कमी उष्मांक जातो. तसेच आवश्यक फायबरची पूर्तता होते आणि पोट बराचवेळ भरलेलं राहतं.