| | |

बदामाचा चहा सूर्रर्र प्या आणि आरामदायी आयुष्य जगा; जाणून घ्या कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मूठभर बदाम आपल्या आरोग्याची काळजी घेण्यास सक्षम असतात हे आपण अनेकांकडून ऐकले असेल. याचे कारण असे कि बदामांध्ये उच्च आणि उत्तम दर्जाचे पोषण असते. जसे कि, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे. इतकेच नव्हे तर बदामामध्ये प्रथिने, फायबर, व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, झिंक हेदेखील पोषक घटक मोठ्या मात्रेत समाविष्ट असतात. हे सर्व घटक आपल्या आरोग्यासाठी खूपच फायदेशीर मानले जातात. म्हणून बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासाठी आणि रक्तातील साखरेची पातळी योग्य राहावी यासाठी बदाम अत्यंत उपयुक्त मानले जातात.

मुख्य म्हणजे, भिजवलेले बदाम मॅग्नेशियमने समृद्ध असतात. जे मधुमेह प्रकार २ने ग्रासलेल्या लोकांसाठी उपयुक्त आहेत. यातील योग्य प्रमाणात असलेले मॅग्नेशियम बॅड कोलेस्टेरॉल कमी करते. परिणामी हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो. यामुळे बदाम कोणत्याही प्रकारे आरोग्यदायी आहे. यासाठी मस्त फक्कड असा बदामाचा चहा पिणेदेखील लाभदायक मानले जाते. होय. बदामाचा चहा. तो कसा बनवायचा माहित नाही? मग काळजी करू नका लगेच जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

बदाम चहा स्टेप बाय स्टेप

१) साधारण २ मूठभर बदाम सुमारे २ तास थंड पाण्यात भिजवा.

२) यानंतर हेच बदाम १५ मिनिटे चांगले गरम पाण्यात भिजवा आणि सोलून घ्या.

३) यानंतर या बदामाची पाणी घालून चांगली बारीक पेस्ट तयार करून घ्या.

४) बदामाची ही पेस्ट उकळण्यासाठी पाण्यात घाला.

५) हे मिश्रण ५ मिनिटे चांगले उकळू द्या.

६) यानंतर आपल्या आवडीप्रमाणे गरम किंवा थंड हा चहा प्यायला तयार. चला तर जाणून घेऊयात बदामाच्या चहाचे आरोग्यदायी फायदे खालीलप्रमाणे:-

फायदे

१) शरीरासाठी फायदेशीर – एका संशोधनात आढळले आहे कि, बदामाच्या चहाचे नियमित सेवन केल्यास यकृताचे कार्य सुधारते. यामुळे किडनीचे संरक्षण होते आणि चयापचय गती सुरळीत झाल्यामुळे आरोग्य राखले जाते.

२) निरोगी हृदय – तज्ञ सांगतात कि, बदामाचा चहा रक्तदाब कमी करतो. हा चहा कोलेस्टेरॉलच्या पातळीवर सकारात्मक परिणाम करतो. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका पूर्णपणे कमी होतो.

३) जुनाट आजार – बदामाच्या चहात आढळणारे अँटिऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून संरक्षण करतात. यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस आणि हृदयरोग, याशिवाय संधिवात आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो.

४) वृद्धत्व विरोधक – बदामाच्या चहामध्ये अनेक अँटीऑक्सिडंट्स असतात. जसे की फायटोस्टेरॉल, अँटिऑक्सिडंट जीवनसत्त्वे, व्हिटॅमिन ई. हे घटक त्वचेतील मुक्त रॅडिकल्सचा प्रभाव कमी करतात. यामुळे अकाली सुरकुत्या कमी होतात.

५) संधिवातावर परिणामकारक – संधिवातासारख्या दाहक समस्या टाळण्यासाठी बदामाचा चहा सर्वोत्तम पर्याय आहे. बदामाचा चहा रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. यामुळे सांधेदुखीची लक्षणेदेखील कमी होतात.