| | |

सकाळी उठताक्षणी कॉफी पिता? मग आताच सावध व्हा अन्यथा…; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकांना अख्ख्या दिवसात मन करेल तेव्हा उठून चहा- कॉफी पिण्याची सवय असते. सवय कसली एका प्रकारचे हे व्यसनच आहे. यातील कॉफी हे पेय अत्यंत लोकप्रिय पेयांपैकी एक आहे. कॉफीमध्ये कॅफिन असते. जे मध्यवर्ती मज्जासंस्था, हृदय आणि स्नायूंना उत्तेजित करते. तर, तज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोपेच्या कमतरतेमुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी १ कप कॉफी काफी है। परंतु इतर सर्व गोष्टींप्रमाणेच कॉफी पिण्याचीही एक मर्यादा असणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया कॉफी पिण्याची योग्य वेळ आणि योग्य मर्यादा.

० सकाळी उठल्या उठल्या कॉफी पिणे आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकते.
– बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर आधी कॉफी पितात. पण असे म्हटले जाते कि, उठल्यानंतर ३ तासांनी कॉफी प्यावी. यामागचे कारण असे की, सकाळी स्ट्रेस हॉरमोन कॉर्टिसॉलचे प्रमाण अधिक असते. हा हॉरमोन शरीराचा अलर्टनेस आणि फोकस वाढवतो आणि रक्तदाब व चयापचय प्रतिरक्षा प्रतिसादापासून प्रत्येक गोष्ट नियंत्रित करतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर कॉफी प्यायल्याने कॉर्टिसॉलची पातळी गडबडते. जे आरोग्यास हानिकारक आहे. इतकेच नव्हे तर दिवस सरता कोर्टिसॉलची पातळी आणखीच कमी होते. तथापि, या गोष्टीचे समर्थन करण्यासाठी अभ्यास आवश्यक आहे. तरीही, सुरक्षिततेसाठी, आपण उठल्यानंतर उशिराने कॉफी पिण्यास काहीच हरकत नाही.

० कॉफीचे व्यसन लागू शकते.
– कोफी मध्ये कॅफिन असते आणि कॅफिनचे अनेक फायदे असतात. मात्र, काही अहवालांनुसार कॅफिनची शरीराला सवय लागते. अर्थात व्यसन लागते. कारण, कॅफिन कोकेनसारखे कार्य करणारी व मेंदूवर परिणाम करणारी काही रसायने सोडतात असे मानले जाते. तसेच कॉफीच्या बियांमध्ये असणारे उत्तेजक द्रव्य ड्रग्ससारखे व्यसन देत नसले तरी जास्त कॉफी प्यायल्याने आपण मानसिक किंवा शारिरीक त्यावर अवलंबून राहता. जसे कि, कॉफीशिवाय चिडचिड होणे, सुस्त वाटणे , थकवा जाणवणे, डोकेदुखी होणे, इत्यादी..

० कोणी कॉफी पिऊ नये?
– काही संशोधनानुसार, रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने पोटातील लाइनिंगचे मोठे नुकसान होते. त्यामुळे आधी काहीतरी खा आणि मगच कॉफी प्या. सामान्य लोकांसाठी, एका दिवसात ४ कपपेक्षा जास्त कॉफी म्हणजे निश्चित आरोग्याचे नुकसान. शिवाय गरोदरपणात २-३ कपपेक्षा अधिक कॉफी पिऊ नये. तसेच दुसरीकडे, आपल्याला एंग्जाइटी डिसऑर्डर, बाईपोलर डिसऑर्डर, हार्ट प्रॉब्लम किंवा अतिसार सारख्या समस्या असतील तर कॉफी प्रामुख्याने टाळा.