| | |

थंडीत स्ट्रॉबेरी मिल्कशेक प्यायला नाहीत तर मजा काय?; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। थंडीच्या हंगामात मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणारे फळ म्हणजे स्ट्रॉबेरी. लाल लाल रंगाची, आंबट गोड चवीची आणि सगळ्यांना आवडणारी स्ट्रॉबेरी सध्या बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे थंडीत हमखास खाल्लं जाणार फार म्हणून याची वेगळीच प्रचिती आहे. स्ट्रॉबेरी हे फळ संकरीत प्रजाती पोटजात फ्रेगेरिया (Fragaria) मधले असुन त्याची मोठ्या प्रमाणावर जगभरात लागवड केली जाते. स्ट्रॉबेरीचा वैशिष्ट्यपूर्ण सुगंध, चमकदार लाल रंग, लज्जतदार पोत आणि गोडपणाबद्दल या फळाचे जगभरात कौतुक केले जाते. स्ट्रॉबेरीचा वापर जॅम, रस, पाई, आईस्क्रीम, मिल्कशेक आणि चॉकलेटसारख्या तयार पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात खाल्ले जाते. स्ट्रॉबेरीची कृत्रिम चव आणि सुवास देखील कँडी, साबण, लिप ग्लॉस, अत्तर आणि इतर बर्‍याच उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात.

स्ट्रॉबेरी या सर्व पर्यायांशिवाय आरोग्यासाठी फार फायदेशीर आहे. कारण स्ट्राॅबेरीत व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के सोबतच फाॅलीक अॅसीड, मॅग्नेशियम, मॅगनीज, आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. स्ट्राॅबेरीत नैसर्गिक साखरे असते. शिवाय यात डाइटरी फायबरचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते. तसेच स्ट्राॅबेरीत फायटोन्यूट्रियंट आणि फ्लोवोनाइडचेही प्रमाण चांगले असते. त्यामुळे थंडीच्या हंगामात हे मोसमी फळ नाही खाल्ले तर फायदा तो काय? शिवाय स्ट्रॉबेरीसोबत दूध प्यालं तर क्या बात है! म्हणूनच आज आपण स्ट्रॉबेरी मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहणार आहोत. चला तर जाणून घेऊयात टेस्टी आणि हेल्दी स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनविण्याची पद्धती खालीलप्रमाणे:-

साहित्य:
१५ स्ट्रॉबेरीज
१ कप स्ट्रॉबेरी आईसक्रीम
१/४ कप थंड दूध
२ टेस्पून मिल्क पावडर
१ ते २ टिस्पून साखर

कृती: सगळ्यात आधी दुधामध्ये मिल्क पावडर मिसळून घ्या. आता दूध पावडर, दूध, साखर, चिरलेल्या स्ट्रॉबेरीज आणि आईसक्रिम हे सर्व जिन्नस ज्युसरमध्ये व्यवस्थित ग्राइंड करून घ्या. तयार शेक ग्लासमध्ये ओता. आता स्ट्रॉबेरीच्या चकतीने डेकोरेट करा आणि थंडगार लगेच सर्व्ह करावे.

टीप:
– स्ट्रॉबेरीवर बारीक बिया असतात. त्या कधीकधी मिक्सरवर बारीक वाटल्या जात नाहीत. अशावेळी स्ट्रॉबेरी सुरीने हलकेच सोलून घ्या.
– स्ट्रॉबेरी मिल्कशेक तयार झाल्यावर स्ट्रॉबेरीचे लहान तुकडे त्यात घाला. यामुळे मिल्कशेक आणखी टेस्टी लागतो.
– स्ट्रॉबेरी मिल्कशेक ग्लासमध्ये ओतल्यावर त्यावर आवडीच्या आईसक्रीमचा स्कूप वा थोडे व्हिप्ड क्रीम घालू शकता. यामुळे तो दिसायला सुंदर आणि पिताना आणखी चविष्ट लागतो.

फायदे

– स्ट्रॉबेरीमध्ये सोडियम, चरबी, कोलेस्ट्रॉल नसते आणि कमी कॅलरीयुक्त आहार म्हणून स्ट्रॉबेरी उत्तम असल्यामुळे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

– स्ट्रॉबेरीमध्ये मॅंगनीज, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन बी 9 असते त्याचा रोगप्रतिकार शक्ती सह शरीरातील अन्य भागांना फायदा होतो.

– रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी स्ट्रॉबेरी खाणे फायदेशीर आहे. म्हणूनच थंडीच्या हंगामात स्ट्रॉबेरी खाण्याचा सल्ला दिला जातो.

– हृदयरोग आणि मधुमेहापासून सुरक्षा हवी असेल तर ताज्या स्ट्रॉबेरीचा ज्यूस जरूर प्या.

– तुम्ही स्ट्रॉबेरी कोणत्याही पद्धतीने खाऊ शकता. मात्र थंडीतील मोसमी फळ म्हणून ओळखले जाणारे हे फळ थंडीतच जास्त फायदे देण्यास सक्षम असते.