| | | |

मेथी दाण्याचे पाणी प्या आणि घरच्या घरी वजन घटवा; कसे? ते जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मेथी दाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत फायदेशीर मानले जातात. कारण मेथी दाण्यांमध्ये आपल्या रक्तातील साखरेची पातळी संतुलित करणारे सक्षम घटक आढळतात. याशिवाय भूक न लागण्याची भावना किंवा शरीराच्या विविध भागांवर चढणारी सूज वा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्यांवर मेथीचे दाणे प्रभावी औषधीप्रमाणे काम करतात. इतकेच काय तर मेथी दाणे रात्रभर पाण्यात भिजवून त्याची सकाळी पेस्ट बनवून लेप तयार करा आणि हा लेप दुखणाऱ्या सांध्यांच्या भागावर लावला असता सांधेदुखीची समस्या दूर होते. मेथीच्या दाण्याचे असे कितीतरी आरोग्यदायी फायदे आहेत. इतकंच काय तर.. मेथी दाण्याच्या सहाय्याने प्रभावीपणे वजन कमी करता येते. कारण मेथीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, लोह, फायबर इ. आवश्यक जीवनसत्त्वे असतात.

० वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे कसे वापरावे?
– वजन कमी करण्यासाठी मेथीचे दाणे वेगवेगळ्या प्रकारे वापरले जाऊ शकतात. मेथीचा कडवटपणा सहन होत नसेल तर दिवसातून दोनदा १-१ चमचा मेथी घेऊ शकता. याशिवाय रात्री २ चमचे मेथी दाणे १ ग्लास पाण्यात भिजवा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्या. असे केल्याने दिवसभर पोट भरलेले जाणवते आणि पचनाची कोणतीही समस्या न होता पूर्ण पोषण मिळते.

– याशिवाय तुम्ही दैनंदिन आहारात मेथी दाणे वापरून वजन कमी करू शकता. यासाठी फक्त १ वाटी मेथी दाणे तव्यावर वा गॅसवर तळून/भाजून घ्या. आता हे भाजलेले मेथी दाणे सामान्य तापमानावर येऊ द्या आणि नंतर याची मिक्सरमध्ये बारीक पावडर बनवा. आता ही पावडर रोज सकाळी १ ग्लास कोमट पाण्यात मिसळून रिकाम्या पोटी प्या. ही पावडर तुम्ही भाजी, मसूर आणि चपातीच्या पिठातदेखील वापरता येईल.

० मेथीचे दाणे वजन कमी करण्यास कशी मदत करतात?
– मेथीच्या बियांमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे भूक कमी होऊन पोट जास्त काळ भरलेले राहते. ज्यामुळे सतत भूक लागत नाही आणि अधेमधे काही खाण्याची इच्छादेखील होत नाही.

० मेथीचे दाणे वापरताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा!
– वजन कमी करण्यासाठी मेथी लाभदायक आहे म्हणून त्याचे प्रमाण अधिक घेऊ नये. मेथीचे मर्यादित सेवन केल्यास शरीराला योग्य मात्रेत पोषण मिळते. शिवाय गर्भवती महिलांनी आणि स्तनदा मतांनी विशेषतः याची काळजी घ्यावी.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *