Lemon Garlic Water
| | |

लसणीचे पाणी प्या आणि थुलथुलीत चरबी घटवा; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। वजन वाढणे किंवा कमी होणे या दोन्ही गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने त्रासदायक आहेत. कारण वजन खूप कमी असेल तरीही आरोग्याच्या तक्रारी संभवतात आणि वजन जास्त असेल तर जास्तच आरोग्याच्या तक्रारी मागे लागतात. आजकाल लठ्ठपणाच्या बऱ्याच तक्रारी वारंवार लोक करत आहेत. याला कारणीभूत आहे ती आपली जीवनशैली आणि आहार. रोजची दगदग आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या वेळा तसेच चुकीचे पदार्थ हे वजन वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात. कारण चुकीच्या वेळी किंवा गरजेपेक्षा जास्त खाल्ल्याने शरीरात ठिकठिकाणी बॅड कोलेस्ट्रॉल साचू लागते. परिणामी चरबीच्या गुठळ्या होतात. यामुळे एकाच ठिकाणी चरबी साचून शरीराचा तो भाग बेढब दिसू लागतो. यामुळे लठ्ठ व्यक्तींच्या मनात न्यूनगंडाची भावना येते. मग अशावेळी बारीक किंवा सडपातळ होण्यासाठी विविध औषधे आणि इंजेक्शन घेतले जातात. ज्यामुळे आरोग्याचे आणखी नुकसान होण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी अगदी सोप्पा आणि घरगुती उपाय घेऊन आलो आहोत.

तुम्हाला लसूण माहित असेलच. कारण लसणीशिवाय आहार करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. हि लसूण जशी फोडणीची लज्जत वाढवते तशीच हि लसूण शरीरावर साचलेली चरबी घटवण्यासाठी लाभदायक आहे. फक्त याचसाठी नाही तर इतरही अनेक कारणांसाठी लसूण आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक आहे. त्यामुळे खूप डाएट आणि वर्कआऊट केल्यानंतरदेखील शरीरात साचलेली अतिरिक्त चरबी कमी होत नसेल तर लसणाचे पाणी पिणे फायदेशीर ठरू शकते. होय. कारण लसणाचे पाणी हे विविध पोषक तत्वांनी परिपूर्ण असून आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लसूण केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही, तर वजन कमी करण्यासोबतच हृदयविकारांपासूनदेखील बचाव करते.

० शरीरातील अतिरिक्त चरबी घटवून वजन कमी करण्यासाठी लसूण कसे कार्य करते?

Garlic
लसणात समाविष्ट असलेले फायबर, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि मॅंगनीज असे हे सर्व पोषक घटक वजन कमी करण्यास सहाय्यक आहेत. शिवाय हे घटक चरबी पातळ करून शरीरातून उत्सर्जित करतात. यामुळे शरीरात रक्त संचरण व्यवस्थित होते. शिवाय निरोगी आणि सक्रिय जीवनशैलीचा अवलंब करीत लसणाचे पाणी वा लसणाचे नियमित सेवन केल्यास अगदी आठवड्याभरातच झपाट्याने वजन कमी होते.

० लसणाचे पाणी कसे बनवायचे?

साहित्य: १ ग्लास पाणी, १/२ लिंबाचा रस, ५ ते ६ किसलेल्या लसणीच्या पाकळ्या.
कृती: यासाठी सर्वात आधी पाणी गरम करून घ्या. यानंतर हे पाणी हलके कोमट झाल्यानंतर त्यात लिंबाचा रस आणि किसलेला लसूण मिसळा. दररोज सकाळी रिकाम्या पोटी या मिश्रणाचे सेवन करा. असे केल्याने शरीरावर जमा झालेली अतिरिक्त चरबी सहज कमी होईल.

० लसणाचे पाणी पिण्याचे फायदे

1. लसूण अँटीबॅक्टरील गुणधर्मयुक्त असल्यामुळे लसणाचे पाणी दररोज पिणे आरोग्यदायी आहे. यामुळे शरीराची रोग प्रतिकार शक्ती मजबूत होते आणि विविध संसर्गांपासून रक्षण होते.

2. लसूण शरीरातील विषारी आणि हानिकारक पदार्थ बाहेर टाकतो. यामुळे शरीरात ठिकठिकाणी साचलेले बॅड कोलेस्ट्रॉल शरीरातून उत्सर्जित होते आणि यामुळे रक्त संचरण व्यवस्थित होते.

3. लसूण चयापचय वाढवते परिणामी शरीरातील ऊर्जा पातळी वाढते. तसेच लसणीचे पाणी उपाशी पोटी प्यायल्याने कॅलरीज बर्न होतात. यामुळे चरबी घटते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

4. लसूण शरीरातील हानिकारक घटक उत्सर्जित करून टाकतो. यामुळे अपचनाच्या समस्या दूर होऊन पचनशक्ती वाढते. परिणामी वजन झपाट्याने कमी होण्यास सहाय्य होते.

5. लसणीतील फायबर भूक नियंत्रित करते. परिणामी लसणीच्या पाण्याचे सेवन केल्यास पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे कोणताही पदार्थ सतत किंवा जास्त खाण्याची इच्छा होत नाही. यामुळे वजनावर देखील नियंत्रण ठेवता येते.