| | |

कोमट दुधात चमचाभर तूप म्हणजे पोटाच्या तक्रारी छूमंतर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। अनेकदा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पोटासंबंधीत समस्या निर्माण होतात. इतकेच काय तर बहुतांश लोक बद्धकोष्ठता आणि ॲसिडीटीच्या त्रासाला याच कारणामुळे लढा देत आहेत. ही एक सामान्य समस्या असली तरी त्याकडे दुर्लक्ष केले असता अल्सरसारख्या समस्या उदभवतात. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी बरेच लोक डॉक्टरांकडे जातात. परंतु हि समस्या घरगुती उपचाराने दूर होऊ शकते. होय. हा एक सोप्पा आणि स्वदेशी उपाय आहे. ज्याचा आयुर्वेदिक डॉक्टरांनीही दावा केला आहे. पोट साफ न होण्याची समस्या असो किंवा अन्य पोटाच्या तक्रारी हा उपाय चुटकीसरशी दूर करतो. मुख्य म्हणजे यासाठी मोजके साहित्य पुरेसे आहे.

विशेष सांगायचे म्हणजे, कोमट पाणी आणि तूप यांचा आयुर्वेदिक औषधांच्या ‘गोल्डन बूक’मध्ये उल्लेख केला आहे. तर १ग्लास गरम पाणी किंवा १ ग्लास कोमट दूध व १चमचा साजूक तूप बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे. मात्र लोकांच्या मनात तुपाविषयी अनेक गैरसमज आहेत. जसे कि तुपाने वजन वाढते, त्वचा तेलकट होते, पोटादुखी किंवा हगवण अश्या समस्या उदभवतात. पण मुळात तुपाचे फायदे मिळविण्यासाठी त्याचे सेवन कसे करावे हे माहीत असणे अत्यंत गरजेचे आहे.

तूप हे ब्युटीरिक अॅसिडचा समृद्ध स्रोत आहे आणि ब्युटीरिक अॅसिडच्या सेवनाने आतड्यांसंबंधी चयापचयामध्ये सुधारणा होते. ज्यामुळे मल त्यागाची प्रक्रिया सोपी आणि त्रासविरहित होते. आरोग्य तज्ज्ञांच्या सांगण्याप्रमाणे, तूप शरीरात चिकटपणा निर्माण करते आणि त्यामुळे आतडी व आजूबाजूचा भाग स्वच्छ राहतो. पॉलिश जर्नल प्रेजेग्लॅड गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, एक ग्लास कोमट पाण्यासोबत एक चमचाभर तुपाचे सेवन केल्यास बद्धकोष्ठतेची समस्या कमी केली जाऊ शकते. त्यामुळे तुपाचे असे सेवन केल्याने पोटदुखी, सूज येणे यावरही आराम मिळतो.

तूप हे एक उत्तम औषध आहे ज्याचा वापर पोटाशी संबंधित विकारांसाठी लाभदायी ठरतो. शिवाय तूप खाल्ल्याने हाडे मजबूत होतात आणि चांगली झोप येते. इतकेच काय तर हे वजन कमी करण्यासाठीही तूप लाभदायक आहे. कारण तुपामुळे शरीरातील फॅट्स कमी होतात. तसेच नियमित सकाळी चमचाभर तूप खाल्ल्याने मेटॅबॉलिझम सुधारण्यास मदत होते. शिवाय तुपामुळे त्वचेतील पेशी पुन्हा पुनरुज्जीवित होतात आणि त्वचा चमकदार होते. सोबतच त्वचा मुलायमदेखील होण्यास मदत होते.