| |

हिवाळ्यात आल्याचा चहा प्या, पण जरा जपून; जाणून घ्या कारण

हॅलो आरोग्य ऑनलाईन। कडाक्याच्या थंडीत सगळ्यात पहिलं काही सुचत असेल तर ते म्हणजे आल्याच्या चहाचा कडक बेत. थंडीच्या दिवसात आल्याचा चहा पिणे बहुतेक लोकांना आवडतो. त्यामुळे घरात असो किंवा बाहेर अशा लोकांचा चहा हवा तर तो आल्याचाच असा अल्लग अट्टाहास असतो. खरंतर आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्य वर्धक आहे. आले बायोएक्टिव युक्त असते. आल्याचे गुणधर्म आरोग्याला अधिक उपयुक्त आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की आल्याच्या चहाचे जास्त सेवन करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. अगदी यामुळे तुम्ही आजारपणाचे शिकार होऊ शकता. चहामध्ये केवळ आलेच नव्हे तर वेलचीचाही अधिक प्रमाणात वापर केल्यास, तेही आरोग्यासाठी हानिकारक ठरते. पण तरीही तुम्हाला आल्याचा चहा प्यायल्याशिवाय चैन पडत नसेल तर तुम्हाला याबाबत सर्व माहिती असणे गरजेचे आहे.

सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्ती दिवसभरात ५ ग्रॅम आले खाऊन पचवू शकते. पण यापेक्षा जास्त आल्याचे सेवन केल्यास आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आल्याची आवड असेल तर जरा सतर्क रहा आणि मग सेवन करा. चला तर जाणून घेऊयात आल्याच्या अतिसेवनाने दुष्परिणाम खालीलप्रमाणे:-

१) जास्त आले पोटात गेल्यास पोटामध्ये तीव्र उष्णता आणि जळजळ होऊ शकते.

२) जास्त आले अँसिडिटीची समस्या वाढवू शकतात. शिवाय यामुळे पोटात गॅस होऊ शकतो.

३) जास्त आल्याचे सेवन केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते. यामुळे मधुमेहींना याचा विशेष त्रास होऊ शकतो. अचानक साखर कमी झाल्यामुळे हायपोग्लायसेमियाची स्थिती निर्माण होऊ शकते.

४) ज्या लोकांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी आल्यापासून दूरच राहणे उत्तम. कारण आल्यामध्ये रक्त पातळ करण्याचा गुणधर्म असतो. यामुळे संबंधित रुग्णांचा बीपी आणखी कमी होऊ शकतो.

५) जास्त आल्याचे सेवन केल्याने निद्रानाश हि समस्या उद्भवते.