Healthy Smoothie For Diabetics
| |

मधुमेह नियंत्रणासाठी बिंधास्त हेल्दी स्मूदी प्या; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मधुमेह हा असा आजार आहे जो वाळवीसारखा शरीराला हळूहळू पोखरतो. यामुळे मधुमेह या आजाराला सर्व सामान्य समजण्याची चूक करू नका. मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरातील रक्तात साखरेचे प्रमाण किती आहे हे त्यांच्या त्रासाची मर्यादा निश्चित करत असते. त्यामुळे मधुमेहींना खाण्यापिण्याची अनेक पथ्ये सांभाळावी लागतात. वेळेत खा. एव्हढेच खा. हेच खा. अशी एक नियमावली मधुमेहींच्या आयुष्याला ग्रहणासारखी लागते. पण आरोग्य सांभाळायचे असेल तर या पथ्यपाण्याचे काटेकोर पालन करणे आवश्यक असते. आजकाल मधुमेह हा आजार कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत सतर्क असणे आवश्यक आहे.

Healthy Smoothie

मधुमेहाने ग्रासलेली व्यक्ती आयुष्यभर एकतर मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी औषधे खाताना दिसते नाहीतर इन्सुलिन घेताना दिसते. त्यामुळे मधुमेह आपली पातळी सोडण्याआधी तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्या. यासाठी खाण्यापिण्याच्या आणि दैनंदिन इतर सवयींमध्ये लहान मोठे बदल करा. आज आपण मधुमेहावर नियंत्रण मिळविण्यासाठी अत्यंत प्रभावी असणारी हेल्दी स्मूदी कशी बनवितात त्याविषयी जाणून घेणार आहोत. यामुळे एकतर मधुमेहाची सुरुवात असेल तर त्यावर मात करता येईल आणि दीर्घकालीन मधुमेह असेल तर तो नियंत्रणात राहील.

मधुमेह नियंत्रित करणारी हेल्दी स्मूदी

० साहित्य

पालेभाजी - पालक/ आंबट चुका/ चाकवत/ मुळ्याची पाने यांपैकी कोणत्याही एका भाजीची ५ ते ६ पाने,
खायचे पान - पुदिना/ कडिपत्ता/तुळशीची पाने कोणत्याही एका प्रकारची १० ते १२ पाने,
फळ - सफरचंद/ पेरू/ स्ट्रॉबेरी यांपैकी कोणतेही एक १/२ फळ,
मसाल्याचे पदार्थ - दालचिनी आणि काळीमिरी प्रत्येकी १ चिमूट,
सैंधव मीठ - चवीनुसार
लिंबू - १ लहान
पाणी - १ ग्लास

० कृती

वर सांगितलेले सर्व साहित्य एकत्र करून व्यवस्थित मिक्सरमधून बारीक करून घ्या. यानंतर सकाळी उपाशीपोटी पोटी प्या. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हि स्मूदी मधुमेहाने ग्रासलेल्या व्यक्ती घेऊ शकतात.

० फायदे

1. हि स्मूदी प्यायल्याने मधुमेहींच्या रक्तातील साखरेवर नियंत्रण राहते. ज्यामुळे मधुमेहींना सतत शुगर कमी जास्त होण्याची चिंता भासत नाही.
2. या स्मूदीतील सर्व घटक हे नैसर्गिक आणि आरोग्यदायी आहेत. यामुळे प्रत्येक जिन्नस योग्य त्या मापात वापरल्यास आरोग्यविषयक इतर समस्यांमध्येही लाभ होतो.
3. यातील घटकांमध्ये मधुमेह विरोधी गुणधर्मांचा समावेश आहे ज्यामुळे मधूमेहावर नियंत्रण ठेवता येते.
4. या स्मूदीचे सेवन नुकताच सुरु झालेला मधुमेह टाळण्यासाठी अतिशय प्रभावी आहे.