| | |

कडाक्याच्या थंडीत प्या गरमागरम गार्लिक सूप; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु असून याचा मध्यान्ह आलाय असे म्हणायला हरकत नाही. कारण दिवसेंदिवस थंडी इतकी तीव्र होऊ लागली आहे कि, शरीराला आतून उष्णतेची अत्यंत आवश्यकता आहे हे जाणवू लागले आहे. मग अश्यावेळी आपल्या आहारात काही किंचित बदल केले तर निश्चितच याचा लाभ होतो. जसे कि मस्त गरमागरम गार्लिक सूप पिणे. होय. गार्लिक सूप हा अतिशय सोप्पा आणि लाभदायक असा पर्याय आहे. त्यामुळे थंडीत होणाऱ्या संसर्गाची भीतीही वाटण्याची गरज नाही. कारण मुळातच लसणीमध्ये इतके विविध औषधी गुण समाविष्ट असतात जे आपल्या शरीराची पूर्ण काळजी घेण्यास सक्षम आहेत. चला तर जाणून घेऊया शे गार्लिक सूप बनविण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आहे फायदे खालीलप्रमाणे:-

हिवाळा म्हटलं की सर्दी खोकला आलाचं. कारण वातावरण बदललं की त्याचा परिणाम शरीरावर होतोच. त्यातच जर तुमची रोगप्रतिकारकशक्ती कमी असेल तर इतरांच्या तुलनेत तुम्हांला वातावरणातील बदलांचा सर्वाधिक त्रास होऊ शकतो. यामुळे यादिवसात रोगप्रतिकारकशक्ती वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन आवर्जुन करावे. त्यातही या सिझनमध्ये बाजारात मिळणाऱ्या फळे, भाज्यांचा आहारात समावेश करावा. त्यातही सूप हे कुठल्याही ऋतूमध्ये पिणे फायदेशीर आहे. हिवाळ्यात लसणाचं सूप अवश्य प्यावे. लसूण उ्ष्ण असल्याने थंडीत लसणाचं सूप पिल्यास सर्दी खोकला , सांधेदुखीपासून आराम मिळतो.

साहीत्य
१ मोठा चमचा लसणीचा किस,
२ चमचे आलं बारीक किसलेले,
२ चमचे गाजराचे बारीक तुकडे,
२ चमचे हिरवा वाटाणा,
२ चमचे मक्याचे दाणे,
२ चमचे बारीक चिरलेला कोबी,
१ छोटी वाटी आवडीच्या कोणत्याही भाज्या
१ चमचा तेल,
१ चमचा कॉर्न फ्लॉवर,
चवीपुरते मीठ,
बारीक चिरलेली कोथिंबीर आवडीनुसार.

कृती – सर्वप्रथम एका पॅनमध्ये तेल गरम करुन घ्या. आता यात आलं आणि लसूण घालून चांगले परतून घ्या. लसणीचा पूर्ण कच्चटपणा जाईपर्यंत आणि ती सोनेरी होईपर्यंत परतून घ्या. आता यात गाजर, वाटाणा, मक्याचे दाणे, कोबी आणि आपल्या आवडीच्या भाज्या टाका. पुन्हा चांगल परतून घ्या. (जर हे सूप नॉनव्हेज बनवायचे असेल तर यात चिकनच्या तुकड्यांचा वापर करा.) आता सर्व मिश्रण परतून घ्या. नंतर यात पाणी टाका. आता हे मिश्रण भाज्या शिजेपर्यंत चांगल उकळवून घ्या. यानंतर आता त्यात मीठ, कोथिंबीर, काळीमिरी पावडर घालून ढवळा आणि कॉर्न फ्लॉवरची पेस्ट करून टाका. चांगली उकळी काढा आणि गरमा गरम भुरके मारत प्या.

फायदे

१) संसर्गापासून बचाव – लसूण आपल्याला सर्दी, ताप व इतर अनेक संसर्गांपासून संरक्षण देते. त्यामुळे लसणीचे सूप प्यायल्यास संसर्गाची भीती वाटत नाही. शिवाय शरीराची रोग प्रतिकारक शक्तीही वाढवतो.

२) सर्दी खोकला पळून जाईल – लसणीतले अँटी बॅक्टेरियल गुणधर्म सर्दी आणि खोकल्यासारख्या आजारांवर प्रभावी काम करतात. यामुळे लसणीचे सूप प्यायल्यास सर्दी खोकल्यापासून मुक्तता मिळते.
लसून तुमच्या शरीराला आतून स्वच्छ करतो आणि हानिकारक रसायन शरीरातून बाहेर फेकतो. लसून आपल्या शरीराला आतून स्वस्थ ठेवतो.

३) कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण – लसणीचे सूप प्यायल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. कारण यामध्ये उपयोगी एन्टीऑक्सीडेंट तत्व असतात जे बॅड कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करतात.

४) रक्तप्रवाहावर नियंत्रण – लसूण खाल्ल्यामुळे शरीरातील रक्त प्रवाह नियंत्रित राहतो. यामुळे रक्तदाबाच्या समस्यांवर नियंत्रण मिळवता येते. सोबतच शरीरात शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहते.

५) पुरुषांसाठी लाभदायक – लसणामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते. यात एलिसीन नावाचा घटकही असतो. दरम्यान लसणावर झालेल्या रिसर्चनुसार लसणात असलेल्या फाइटो केमिकल्समध्ये पुरुषांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्याची सक्षमता असते.

६) त्वचेसाठी फायदेशीर – लसणीमध्ये असणारे लाभदायक तत्व आपल्या त्वचेला उष्णता, पुरळ, डाग आणि त्वचा सुटणे यापासून वाचवितात. शिवाय लसणीचे सूप प्यायल्याने त्वचेवर होणारे फंगल इन्फेक्शनसुद्धा दूर करता येते. त्यामुळे जेव्हा हि फंगल इन्फेक्शन होते लसूण अमृता समान काम करतो.

० अत्यंत महत्वाचे

– कोणत्याही वैद्यकीय शस्त्रक्रिया किंवा सर्जरीपूर्वी लसूण खाऊ नये.

– आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ३ ते ४ पेक्षा जास्त लसणाच्या पाकळ्यांचे सेवन करा.

– अस्थमाच्या रोग्यांनी लसूण खाऊ नये. यामुळे त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात.