Drink lemon tea daily and reduce belly fat
|

दररोज प्या लिंबाचा चहा आणि पोटावरची चरबी करा कमी

हॅलो आरोग्य  ऑनलाईन ।  आपल्या दैन्यदिन च्या सवयींमध्ये चहाची सवय हि असतेच . चहा हा नाही पिला तर मात्र आपल्याला चुकल्यासारखे वाटते. अनेकांना चहाची तालप इतकी असते कि, त्या वेळेत चहा नाही झाला किंवा उपलब्ध नसेल तर मात्र चिडचिड होण्यास सुरुवात होते. पण जास्त प्रमाणात चहा पिणे सुद्धा आरोग्यासाठी फार धोकादायक आहे. चहाचे वेगवेगळे प्रकार आहेत, पण जर कोणत्याही चहामध्ये कॅफीनचे प्रमाण जास्त असेल तर तो चहा हा आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगला नाही. त्यामुळे त्याच जागी आपण जर लिंबाचा चहा घेतला तर मात्र आपल्या शरीराला फायदे आहेत, ते जाणून घेऊया….

—- लिंबात सायट्रिक ऍसिड आढळतं. जे आपल्या पचन क्रियेला सुरळीत करत. दररोज सकाळी हे प्यावं. चहाऐवजी हा पदार्थ घेतल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारचा पोटाचा विकार हा होत नाही.

— लेमन टी मध्ये फ्लेवोनॉइड्स नावाचे रसायन आढळते. या मुळे रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या होत नाही आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका येणाच्या धोका कमी संभवतो.

— लेमन टी शरीराची प्रतिकारक शक्ती वाढवते.

— लेमन टी प्यायल्याने सर्दी आणि फ्लू सारख्या समस्या उद्भवत नाही.

— या मध्ये बऱ्याच प्रमाणात अँटीऑक्सीडेंट चे गुणधर्म आढळतात. या सह यामध्ये पॉलिफिनॉल आणि व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात आढळत. जे शरीरात कर्करोगाच्या पेशींना तयार होण्यापासून रोखतो.

–लेमन टी तयार करताना काही प्रमाणात पाणी उकळून घ्यावे त्याच्यामध्ये लिंबाचे काही थेंब टाकावेत आणि त्यानंतर काही प्रमाणात मध टाकून ते पाणी पिण्यास सुरुवात करावी त्याने आपल्या पोटावरची चरबी हि काही प्रमाणात कमी होते.