| |

निरोगी आरोग्यासाठी केशरी गाजराचा ज्यूस प्या; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सध्या हिवाळ्याचा हंगाम सुरु आहे. या हंगामात बाजारात लाल आणि केशरी रंगाचे असे गाजर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत असते. आपण अनेकदा ऐकले असेल कि केशरी गाजर खाणे आपल्या डोळ्यांकरिता चांगले असते. याशिवाय गाजर खाणे शारीरिक आरोग्याच्या दृष्टीने देखील अतिशय लाभदायक असते. केशरी गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असे अनेक पोषक घटक असतात. अनेक लोक गाजरापासून लोणचे, हलवा आणि कोशिंबीर बनविण्यासाठी वापर करतात. तर अनेकजण आपल्या डाएटमध्ये गाजरचा ज्यूस समाविष्ट करतात. चला तर जाणून घेऊया गाजराचा ज्यूस पिण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) रोग प्रतिकार शक्तीत सुधार – गाजरचा ज्यूस प्यायल्याने रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि वारंवार होणारी सर्दी, खोकला अश्या संसर्गजन्य रोगांपासून शरीराची सुरक्षा होते.

२) शरीर आतून स्वच्छ होते – शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी गाजराचा ज्यूस फायदेशीर आहे. यासाठी गाजर, लिंबू, आलं, पुदिना आणि मिठ एकत्र करून त्याचा ज्यूस बनवून प्या.

३) रक्त शुद्धीकरण – गाजर ज्यूस प्यायल्याने रक्त शुद्ध आणि स्वच्छ होते. परिणामी रक्तदाब नियंत्रित राहतो. शिवाय संपूर्ण शरीरात योग्यरीत्या रक्ताभिसरण होते.

४) सूर्य किरणांपासून डोळ्यांची सुरक्षा – गाजर ज्यूसमध्ये भरपूर व्हिटामिन ए असते. ज्यामुळे डोळ्यांशी संबंधित समस्या दूर होतात. शिवाय सूर्याच्या किरणांपासून डोळ्यांचा बचाव होतो.

५) पचनक्रियेसाठी लाभदायी – गाजर ज्यूसमध्ये नेक पौष्टिक तत्त्वे असतात. यामुळे गाजर ज्यूस प्यायल्याने पचनप्रक्रिया निरोगी राहण्यास मदत होते. गाजरच्या ज्यूसमध्ये मीठ, कोथिंबीर, जिरं, मिरीपूड आणि लिंबाचा रस एकत्र करून प्यायल्याने पचनासंबंधित समस्या दूर होतात. शिवाय बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

६) मूत्रसंबंधित समस्यांपासून सुटका – गाजरचा ज्यूस कधीच गाळून पिऊ नका. कारण त्यामुळे ज्यूसमध्ये असलेल्या फायबरचा शरीराला फायदा होत नाही. म्हणून गाजर ज्यूस न गाळता प्या. असे केल्यास मूत्रसंबंधित समस्या होत नाहीत.

७) संधिवातापासून आराम – गाजरामध्ये व्हिटामिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे संधिवात सारख्या समस्या उद्भवत नाहीत.

८) दात आणि हिरड्यांची मजबुती – गाजरात व्हिटामिन सी भरपूर असल्यामुळे दात बळकट आणि हिरड्या निरोगी राहण्यास मदत होते. दररोज गाजर ज्यूस प्यायल्याने रक्तस्त्रावाची समस्या देखील दूर होते.

९) मासिक पाळीच्या त्रासावर फायदेशीर – महिलांना मासिक पाळीदरम्यान फार त्रास होतो. या त्रासापासून सुटका हवी असेल तर मासिक पाली दरम्यान गाजर ज्यूस प्या. यामुळे निश्चितच आराम मिळतो.