| |

शरीरातील पांढऱ्या पेशी वाढविण्यासाठी पपईच्या पाल्याचा औषधी रस प्या; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। एकीकडे कोरोना तर दुसरीकडे ‘डेंग्यू’ , स्वाईन फ्ल्यू अशा आजारांनी हळूहळू आपलं डोकं वर काढलं आहे. यामुळे दिवसेंदिवस लोकांमध्ये भीतीचे वातावरण वाढताना दिसत आहे. याशिवाय सतत सोशल मीडियावर फिरणाऱ्या बातम्या आणि अफवा यांमुळे जनमानसात साहजिकच खचण्याचे प्रमाण वाढले आहे. तर मित्रांनो खचून जाण्याची गरज नाही वा घाबरण्याचीसुद्धा गरज नाही. कारण अनेक असे घरगुती उपाय आहेत जे आपले अनेक आजारांपासून संरक्षण करण्यास सक्षम आहेत. जसे कि, पपईचा पाला. होय पपईच्या पाल्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात.

वास्तवात पपईची पानं आरोग्यदायी असल्याचे आयुर्वेदातही सांगितले आहे आणि तज्ञांनी सिद्धदेखील केले आहे. पपईच्या पाल्यामध्ये कर्करोगाशी सक्षमतेने सामना करणारे घटक असतात. शिवाय शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासदेखील हा पाला मदत करतो. याशिवाय आपल्या शरीरातील रक्तपेशींना सक्रिय करण्यासाठीदेखील पपईचा पाला उत्तम उपाय आहे. याचे मुख्य कारण म्हणजे पपईच्या पानांत ए, सी, ई, के आणि बी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. यामुळे शरीरातील रक्त साखळून न राहता प्रवाही आणि शुद्ध होते. तसेच रक्तातील प्लेट्सकाऊंट वाढतात आणि यामुळे शरीराचे तसेच यकृताचे होणारे नुकसान टळते. चला तर जाणून घेऊयात पपईचा रस औषधी म्हणून याचे सेवन कसे करावे?

० पपईच्या पाल्याचा औषधी रस कसा बनवालं?
– खरतर पपईचा रस बनविण्यासाठी लागणारे साहित्य हे ढोबळमाने घ्यायचे असते. यामुळे त्याच्या साहित्याचे निश्चित माप नाही.
साहित्य:
पपईची पाने अंदाजानुसार,
थोडेसे पाणी आवश्यकतेनुसार,
मीठ वा साखर चवीप्रमाणे.

कृती – यासाठी सर्वप्रथम पपईची कोवळी पानं घ्या. या पानांचे देठ काढून फक्त पानं स्वच्छ धुवून घ्या. यानंतर खलबत्ता वा मिक्सरमध्ये ही पानं व्यवस्थित वाटून त्याची पेस्ट करा. आता या मिश्रणामध्ये पाणी मिसळा आणि सोबत मीठ वा साखर मिसळून घ्या.

० पपईच्या औषधी रसाचा वापर आणि प्रमाण – साधारण ८ तासांच्या अंतराने हा रस दिवसातून दोनदा प्या. मात्र याचे र्पमान वयोमानानुसार वेगवेगळे असू शकते. जाणून घ्या खालीलप्रमाणे:-

लहान मुले वयवर्षे ५ ते १२ – ५ मिली /दिवसातून दोनदा

लहान मुले १० वर्षावर – २.५ मिली

मध्यमवयीन २० ते ४० वयवर्षे लोकांसाठी – १० मिली / दिवसातून दोनदा

० कोणत्या रुग्णांनी हा रस कधी प्यावा ?
– डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार डेंग्यूची लक्षण आढळल्यास / निदान झाल्यास हा रस प्यायला सुरवात करा. कारण या आजारामध्ये झपाट्याने प्लेट्स कमी होतात. त्यामुळे प्लेट्स १,५०,००० पेक्षा कमी होण्याआधी हा रस प्यायला सुरवात करा. कारण या आजाराची गंभीरता वाढल्यास काही अवयव निकामी होण्याची शक्यता वाढते.