Raisin Water
| | |

मनुक्याचे पाणी प्या आणि नैराश्यापासून मुक्ती मिळवा; जाणून घ्या साहित्य, कृती आणि फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सुका मेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी कोणत्याही ऋतूत खाणे फायदेशीर आहे. त्यातही खास करुन मनुका खाणे अधिक फायद्याचे आहे. कारण मनुक्यामध्ये लोह, पोटॅशियम आणि तंतू (फायबर) यांसारखे बरेच पोषक गुणधर्म समाविष्ट असतात. त्यामुळे रक्तदाबाची समस्या नियंत्रत राहते शिवाय पचन व्यवस्थित होते आणि मुख्य म्हणजे नैराश्यापासून बचाव होतो. याशिवाय मनुका मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतो. याशिवाय मनुक्याचे पाणी प्यायल्याने हे सर्व फायदे शरीराला लवकर प्राप्त होतात. म्हणूनच आज आपण मनुक्याचे पाणी आणि त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

० मनुक्याचे पाणी कसे तयार करालं?

साहित्य -
१ ग्लास पाणी
१०- १२ काळे गडद मनुके
कृती - यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात पाणी गरम करून घ्या आणि या पाण्यात मनुके रात्रभर भिजत घाला. यानंतर सकाळी हे मनुके टम्म फुगलेले दिसतील आणि पाण्याचा रंग बदललेला दिसेल. आता हे पाणी गाळून घ्या आणि प्या.

० मनुक्याचे पाणी पिण्याचे फायदे

१) हृदयाचे संरक्षण

मनुक्याचे पाणी दररोज प्यायल्यास काेलेस्ट्रेराॅलचे प्रमाण संतुलित राहाते. यामुळे हृदयासंबंधीत कोणतेही आजार आणि समस्या दूर होतात.

२) यकृतासाठी फायदेशीर

मनुक्याचे पाणी यकृतामध्ये बायोकेमिकल प्रोसेस सुरू कारण्यासाठी मदत करते. ज्यामुळे रक्त वेगाने शुद्ध होते आणि त्याचे संचरण देखील व्यवस्थित होते. परिणामी या पाण्याचे सेवन यकृतासंबंधी आजारांपासून बचाव करते.

३) रक्तदाबावर नियंत्रण

मनुक्याच्या पाण्यात असे बरेच गुणधर्म समाविष्ट आहेत जे रक्ताशी संबंधित समस्येत आराम देतात. यातील पोटॅशियम आणि तंतू हे रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

४) अॅनिमियावर मात

मनुक्याच्या पाण्यामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. इतकेच नव्हे तर मनुक्यांमध्ये रक्त निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्सचे प्रमाण देखील अधिक असते. त्यामुळे मनुक्याच्या पाण्याचे सेवन केल्यास अॅनिमियावर मात करता येते.

५) दृष्टी सुधार

मनुक्याच्या पाण्यात समाविष्ट असणारे व्हिटॅमिन ए डोळ्यांची दृष्टी सुधारून चांगली करते. त्यामुळे ज्यांना रात आंधळेपणा किंवा डोळ्यांचे स्नायू अशक्त असण्याची समस्या आहे त्यांनी मनुक्याचे पाणी प्यायल्यास फायदा होतो.

६) नैराश्यापासून बचाव

जर तुमचा मूड सतत खराब होत असेल आणि कशातही मन लागत नसेल. दरम्यान तुम्ही नैराश्याला बळी पडत असल्याची कोणतीही लक्षणे आढळ्यास दररोज मनुक्याचे पाणी प्या. यामुळे मूड बुस्ट होतो आणि नैराश्यापासून बचाव होतो.