|

काय सांगताय काय? बिअर पिणं आरोग्यासाठी लाभदायक?; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। बिअर हा प्रकार मद्य पेयांपैकी एक आहे आणि मद्य पिणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण तरीही कित्येक लोक अगदी आवडीने आणि सवडीने मद्य पितात. कारण बिअर हे जगातील सर्वात जुने आणि सर्वाधिक प्रमाणात वापरलेले अल्कोहोलिक पेय आहे. मुख्य म्हणजे पाणी आणि चहा नंतर तिसरे सर्वात लोकप्रिय पेय म्हणजे बिअर होय. आता पार्टीचा मूड म्हणा किंवा विकेण्डची मजा यासोबत बिअरचा ग्लास हे एक वेगळेच कॉम्बिनेशन आहे जे अनेकांचे आवडते कॉम्बिनेशन म्हणून ओळखले जाते.

सांगायचे मुख्य म्हणजे, इतर हार्ड ड्रिंक्सच्या तुलनेत बिअरमध्ये अल्कोहोलचे प्रमाण कमी असते. पण बिअरमध्ये कॅलरीज अधिक असू शकतात. यामध्ये साधारंण ४ ते ६ टक्केच अल्कोहोल असते. तथापि, आपण वापरत असलेल्या बिअरच्या ब्रँडनुसार अल्कोहोलचे प्रमाण बदलू शकते. साधारण एका बिअरमध्ये २०८ कॅलरीज असतात. यामुळे वजनाबाबत काळजी करणाऱ्यांनी किती प्रमाणात बिअर घ्यावी? हा प्रश्न सर्वसाधारणपणे पडतो.
० लाईट बिअरचा एक कॅन – 102.7 cal (1 can = 350ml)
० रेग्युलर बिअरचा एक कॅन – 153.1 cal ((1 can = 350ml)
० बाटलीभर फ्रुट बिअर – 130 cal (1 bottle = 550 ml)
० बाटलीभर Sapporo बिअर – 257 cal ((1 bottle = 550 ml)

– पण जर तुम्हांला वजन आटोक्यात ठेवायचे असेल तर रेग्युलर बिअरऐवजी लो कॅलरी बिअरची निवड करा. यामुळे तुमचे वजन आटोक्यात राहण्यासाठी मदत होते. बाजारात अनेक लो कॅलरी बिअरचे पर्याय उपलब्ध आहेत.
यानंतर आता आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत जी तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते. बिअर पिणे आरोग्यासाठी लाभदायक आहे. होय. वाटलं ना आश्चर्य. चला तर जाणून घेऊयात बिअर पिण्यामुळे काय फायदे होतात ते खालीलप्रमाणे:-

१) काही संशोधनानुसार, आठवड्यातून तीनदा आणि प्रमाणात बिअर प्यायल्यास अर्थ्राईटीसचा त्रास कमी होतो.

२) बिअर प्यायल्याने शरीराच्या रोग प्रतिकारक शक्तीला चालना मिळते. परिणामी अनेको आजार दूर राहतात.

३) एका संशोधनानुसार, नियमित सुमारे ४७३ मिली (१ पिंट) बिअर प्यायल्याने हृद्याचे कार्य सुधारते.

४) बिअर पिण्यामुळे हृद्याच्या रक्त वाहिन्या अधिक लवचिक बनतात. बिअर प्यायल्यानंतर सुमारे तासाभरातच रक्तपुरवठा सुधारायला मदत होते.

५) बिअर प्यायल्याने मेंदूतील डोपामाईन घटकाला चालना मिळते. यामुळे आपला मुड चांगला आणि आनंदी होण्यास मदत होते.

६) शिजवलेल्या मांसामधील कॅन्सरला चालना देणारे घटक कमी करण्याची क्षमता बिअरमध्ये असते. त्यामुळे प्रमाणात बिअरचे सेवन करणे निश्चितच आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.