| |

हिवाळ्यात शिंगाड्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। मित्रांनो शिंगाडा हे एक असं फळ वा अशी भाजी आहे जे थंडीच्या हंगामात खाणे आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत लाभदायी असते. तर शिंगाडा ही पाण्यातील भाजी असल्यामुळे अनेकजण तिला ‘वॉटर चेस्‍टनट’ म्हणून देखील ओळखतात. अगदी एखाद्या फळासारखी दिसणारी हि भाजी पावसाळ्यात उगवते आणि हिवाळ्याच्या सुरुवातीला बाजारात विक्रीसाठी येते. शिंगाड्यामध्ये कॅलरीज कमी आणि प्रथिने, पोटॅशियम, मॅंगनीज, तांबे, व्हिटॅमिन बी 6 तसेच रिबोफ्लेविनसारख्या पोषक तत्वांचा समावेश जास्त आढळतो. शिवाय शिंगाड्यात मोठ्या प्रमाणात फायबर असते जे पोट भरण्यासाठी उपयुक्त ठरते. अनेकजण ते उकडून खातात. अनेकांना शिंगाडा कच्चादेखील खायला आवडतो. याशिवाय महत्वाचे म्हणजे शिंगाड्यांच्या पाण्याच्या सेवनानेदेखील अनेक प्रकारच्या आरोग्यविषयक समस्या दूर होतात. आज आपण शिंगाड्याच्या पाण्याचेच फायदे जाणून घेणार आहोत. चला तर जाणून घेऊयात फायदे खालीलप्रमाणे:-

० शिंगाड्यांच्या पाण्याचे सेवन केल्यास हृदयरोग दूर राहतो. कारण शिंगाड्याचे पाणी हे शरीरातील रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रित करते. परिणामी हृदयविकाराचा धोका कमी होतो.

० याशिवाय शिंगाड्याच्या पाण्यातील पोटॅशियम हृदयसंबंधित कोणत्याही आजाराचा धोका कमी करण्यासदेखील उपयुक्त आहे.

० शिंगाड्याच्या पाण्याचे सेवन केल्यास ताण तणाव दूर होतो.

० शिंगाड्यातील अनेक पोषक तत्त्वे त्याच्या पाण्यात उतरलेली असतात यामुळे शरीराचा आणि मनाचा थकवा दूर होतो. त्यामुळे जर तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर शिंगाड्याच्या पाण्याचे सेवन नक्की करा.

० शिंगाड्यांमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आढळतात. जे शरीरातील फ्री रॅडिकल्ससारखे हानिकारक घटक शरीरातून बाहेर काढून टाकतात. यामुळे शरीर निरोगी राहते.

० वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शिंगाड्यांचे पाणी पिणे फायदेशीर आहे. कारण, यामध्ये भरपूर फायबर असते. परिणामी पोट जास्त काळ भरलेले राहते. यामुळे लवकर भूक लागत नाही आणि वजन कमी करण्यास मदत होते.

० याशिवाय शिंगाड्याचे पाणी जुने आजार, हृदयविकार, मधुमेह प्रकार २ हे आजार बरे करण्यासाठी उपयुक्त आहे.