| | |

हिवाळ्यात पालक ज्युस पिणे शरीरासाठी फायदेशीर; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन| सध्या हिवाळ्याच्या हंगाम सुरू असून सर्वत्र कडाक्याची थंडी पडली आहे. अश्या दिवसात आपल्या शरीराला ऊर्जेसाठी पूरक आहार गरजेचं असतो. मात्र हा आहार केवळ शारिरीक आरोग्य नव्हे तर मानसिक आणि त्वचेचे आरोग्य देखील व्यवस्थित ठेवेल असा हवा. कारण वातावरण बदलले की याचा परिणाम आपल्या शरीरावर, त्वचेवर, केसांवर आणि अगदी मेंदूच्या विकासावर देखील होत असतो. म्हणून तज्ञांच्या सल्ल्यानुसार हिवाळ्याच्या दिवसांमध्ये पालक ज्यूस अर्थात पालकचा रस पिणे गरजेचे आहे.

 

याचे कारण म्हणजे, पालक भाजी म्हणून खा किंवा पालकाचा रस प्या दोन्ही बाबतीत पालक आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरतो. पालकमध्ये कॅरोटेन, अमिनो अॅसिड, लोह, आयोडीन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. त्यात जीवनसत्त्वे ए, सी, के, ई आणि बी कॉम्प्लेक्स देखील भरपूर असतात. चला तर जाणून घेऊया पालक ज्यूस बनविण्यासाठी लागणारे साहित्य, कृती आणि फायदे

० पालक ज्यूस बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१ जुडी पालक

थोडासा पुदिना

१ लिंबू

चवीनुसार मीठ

१/२ चमचा साखर

 

० कृती- पालक ज्यूस बनविण्यासाठी आधी पालक धुवून गरम पाण्यात १० मिनिटे ठेवून शिजवून घ्या. यानंतर पालक, पुदिना आणि साखर मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्या. आता हा तयार ज्यूस ग्लास मध्ये काढा आणि त्यात लिंबाचा रस, चवीनुसार मीठ मिसळून आवश्यकतेप्रमाणे पाणी मिसळून प्या. हा ज्यूस तुम्ही सकाळी नाश्ता करतेवेळी पिऊ शकता.

 

० फायदे –

 

१) पोटाच्या समस्या – पालक ज्यूस प्यायल्याने पोटाशी संबंधित समस्या सर्व दूर होतील. कारण पालकमध्ये मोठ्या प्रमाणत फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठतादेखील त्रास देत नाही.

 

२) अॅनिमिया – आपल्या शरीरात रक्ताची कमतरता असणे म्हणजेच अॅनिमिया. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी पालक ज्यूस प्या. कारण पालकमध्ये असणारे लोह रक्तपेशी सक्रिय करतात आणि सक्षम करतात. परिणामी शरीरातील रक्ताची कमतरता जलद दूर होते.

 

३) ऑस्टिओपोरोसिस – ऑस्टियोपोरोसिस हा हाडांचा आजार असून यावर पालक प्रभावी आहे. कारण पालकमध्ये व्हिटॅमिन के आढळते. याच्या मदतीने कॅल्शियम हाडांच्या आत घट्ट राहते. परिणामी हाडे निरोगी आणि मजबूत होतात.

 

४) संधिवात – पालक क्षारयुक्त असल्यामुळे संधिवाताचा त्रास असणाऱ्या रुग्णांनी पालक भाजी किंवा ज्यूस कसाही सेवन करणे फायदेशीर आहे.

 

५) केस आणि त्वचा – पालकचे नियमित सेवन केल्यास त्वचेची गेलेली चमक परत येते आणि त्यात मुलायमपणा येतो. शिवाय सुरकुत्या आणि काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. तसेच पालकमध्ये असलेले व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स केसांची वाढ वाढवण्यासोबतच केस मजबूत होण्यासाठी मदत करतात.