Tea
| | |

रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक आहे; जाणून घ्या कारण आणि दुष्परिणाम

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपल्यापैकी कितीतरी लोकांनी सकाळ, दुपार, संध्याकाळ आणि अगदी रात्रसुद्धा चहासोबत होत असेल. चहा पिण्याची हि सवय जणू व्यसनच झाले आहे. त्यामुळे कंटाळा आला प्या चहा.. बाहेरून आलो प्या चहा.. पाहुणे म्हणून गेलो तर प्या चहा आणि पाहुणे आले तरी प्या चहा. अख्ख्या दिवसात एक कारणही आपल्याला चहा पिण्यासाठी पुरत.

इतका आणि वाट्टेल तेव्हा चहा पिणे आरोग्यासाठी नुकसानदायी असू शकते असे किती जणांना वाटते..? तुम्हाला वाटते का?? तर मित्रांनो जर तुम्ही बेड टी पिणाऱ्यांपैकी असाल तर १००% चहा तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक भूमिका बजावतो. आता ते का आणि त्यामुळे काय होत ते आपण जाणून घेऊ.

० रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक का आहे?

अनेकांना सकाळी उठल्या उठल्या चहा पिण्याची सवय असते. ज्यामुळे यकृतातून बाहेर पडणारा पित्ताचा रस पचन प्रक्रियेत मदत करत नाही. परिणामी उलट्या, चक्कर येणे, छातीत जळजळ आणि ओटीपोटात दुखणे अशा समस्या उद्भवतात. याचे मूळ कारण म्हणजे, रात्रभर तोंडात अनेक बॅक्टेरिया तयार होतात. जे सकाळी चहा पिताना आपल्या पोटात जातात. हे चांगल्या बॅक्टेरियांना त्रास देतात. ज्यामुळे चयापचयावर परिणाम होतो आणि पोटाच्या विविध समस्या सुरू होतात.

० रिकाम्या पोटी चहा पिण्याचे दुष्परिणाम

१) पोषणाची कमतरता – रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने शरीरातील पोषक तत्वांचे शोषण नीट होत नाही. ज्यामुळे पोटाच्या विविध आरोग्यविषयक तक्रारी निर्माण होतात.

२) डीहाइड्रेशन – रात्रभर झोपल्याने शरीराला त्या वेळेत पाणी मिळत नाही. परिणामी शरीर डीहाइड्रेट होते. अशा परिस्थितीत शरीरात कॅफीन मिसळल्यास डिहायड्रेशनची समस्या आणखीच वाढते.

३) चयापचय – चहामुळे शरीरातील ऍसिड आणि अल्कधर्मी असंतुलित होते. परिणामी चयापचय विस्कळीत होतं.

४) आंबटपणा – रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामूळे भूक लागत नाही. यामुळे पोट बराच काळ रिकामी राहिल्याने ऍसिड निर्मिती होते आणि गॅसचा त्रास होतो. त्यामुळे पोटात अ‍ॅसिडिटीचा त्रास सुरू होतो.

५) व्रण – सकाळी रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने पोटातील पृष्ठभागाचे नुकसान होते. असे नियमित केल्याने अल्सर आणि अ‍ॅसिडिटी होते.

६) कमकुवत हाडे – रिकाम्या पोटी चहा प्यायल्यामुळें शरीरातील सांधे दुखू लागतात. परिणामी हाडे कमकुवत होतात.

७) दातांचे नुकसान – रिकाम्या पोटी चहा प्यायल्यास शरीरात आम्लपित्त तयार होते. ज्यामुळे दातांचा इनॅमल खराब होऊन हिरड्यांमध्ये वेदना होण्याची समस्या वाढते.

८) निद्रानाश – सकाळी सकाळी रिकाम्या पोटी वा दिवसभरात जास्त चहा प्यायल्याने झोप न येण्याची समस्या वाढते. यामुळे चिडचिड आणि थकवा येण्याची समस्या सुरू होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *