| |

‘हे’ पेय उपाशी पोटी प्याल तर झटपट अनावश्यक चरबी घटवाल; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। दरोरोजचे दगदगीचे जीवन, अस्ताव्यस्त जीवनपद्धती आणि यावेळी चुकीचे खाणे पिणे यामुळे आजकाल अनेकांमध्ये लठ्ठपणाची समस्या दिसून येते. जेव्हा एखादी व्यक्ती आवश्यकतेपेक्षा जास्त कॅलरीजचे सेवन करते, तेव्हा या अतिरिक्त कॅलरीज चरबी स्वरूपात शरीरात साठण्यास सुरुवात होते. दरम्यान शरीरावर अनावश्यक जमा झालेली चरबी शरीराचे आरोग्य धोक्यात टाकते. शिवाय हा लठ्ठपणा अनेक गंभीर आजार ओढवतो. मुख्य म्हणजे जंक फूडचे अधिक सेवन आणि फळं आणि भाज्यांचा आहारात कमी समावेश केल्याने स्थूलपणाची समस्या उदभवते. म्हणूनच या लेखातून आम्ही तुम्हाला असे एक पेय तयार करण्याची पद्धत आणि फायदे सांगणार आहोत जे तुम्हाला या समस्येपासून दूर ठेवेल आणि सुदृढ बनवेल. हे पेय आयुर्वेद डॉक्टर अबरार मुलतानी यांच्या अभ्यासातून समोर आलेले आहे.

साहित्य :-
१ काकडी,
१ चमचा आल्याचा रस
१ लिंबाचा रस,
२० ग्रॅम पुदीना

कृती:- हे सर्व एक ग्लास पाण्यासह मिक्सरमध्ये मिसळून त्याचा रस बनवा. त्यानंतर ७ ग्लासांमध्ये चांगले पाणी घेऊन हे मिश्रण प्रत्येक ग्लासात बरोबर मात्रेत मिसळून रात्रभर ठेवून द्या. रात्रभर ठेवल्यानंतर सकाळी उठून यातील एक ग्लास पाणी प्या. असे सलग ७ दिवस तुम्हाला हे पाणी प्यायचे आहे. यानंतर तुम्ही तुमच्या वजनाची नोंद केली असता निश्चितच फरक दिसेल.

फायदे :- डॉक्टर अबरार मुलतानी यांच्या अभ्यासानुसार, हे पेय आपले शरीर डिटॉक्सिफाई (स्वच्छ) करते आणि चरबी वितळवण्यास मदत करते. त्याप्रमाणे, ते चयापचय क्रिया वाढवून पचन सुधारते. या पेयामूळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो. डॉ. मुल्तानी यांच्या सांगण्यानुसार, ज्यांना नाकातून रक्त येणे, मूळव्याध, पोटातील अल्सर हे त्रास असतील त्या व्यक्तींनी या पेयाचे सेवन करू नये. त्याचप्रमाणे गरोदर महिलांनी देखील हे पेय पिऊ नये.