Dye your hair with the help of red bits

लाल बिट च्या मदतीने रंगवा तुमचे केस

हॅलो आरोग्य ऑनलाईन । आजकाल बाजारात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कलर हे आपल्या केसांसाठी  आहेत . केस सुंदर दिसण्यासाठी नेहमी आपण वेगवगेळ्या क्लुप्त्या वापरण्याचा  प्रयत्न करतो.  केसांना    कलर  करायचा असेल तर रासायनिक घटकांशिवाय आपल्याकडे  सर्वसामान्यपणे  सुरुवातीपासून सगळे जण केस कलर करायचे असतील तर नेहमी  मेहंदीचाच विचार  करतात. कारण , कि मेहंदीच्या मदतीने आपले केस कलर चांगले होऊ शकतात. पण केस कलर करताना मेहंदी पेक्षा अनेक नवीन उपाय पण आहेत . अशा नवीन प्रॉडक्ट मध्ये जास्त रासायनिक घटकांचा वापर हा केला असल्याने ते आपल्या केसांसाठी योग्य नाही.   रासायनिक घटकांचा वापर  करून  आपले केस  कलर करण्यापेक्षा   घरगुती उपाय करून करता येऊ शकतात.   रासायनिक पदार्थांमुळे आपले केस  हे फार रफ आणि   तुटायला सुरुवात होते . त्यावेळी केसांसाठी घरच्या घरी  बिटाच्या  रसाचा वापर हा केसांसाठी करू शकतो. ते कसे ते जाणून घेऊया ….

तुम्हाला तर माहीतच आहे कि , आपण ज्यावेळी बिट खातो. त्यावेळी आपल्या जिभेला लाल रंग येण्यास सुरुवात होते . आणि तो बराच काळ हा कलर टिकतो. अशा वेळी हाच कलर आपण आपल्या केसांना सुद्धा लावू शकतो. बिटाच्या रसाचा वापर हा जर आपल्या काळ्याभोर केसांवर केला गेला तर मात्र तुमचे केस हे अजून मुलायम दिसायला मदत होते . त्यात काळ्या केसांवर हा कलर हा उठून दिसत असतो. हा रस वापरताना काही प्रमाणात काळजी पण घेतली गेली पाहिजे .

एक स्वच्छ बीट धुवून घ्या . त्याचे छोटे छोटे काप तयार करून त्याचा रस तयार करा. काही प्रमाणत त्याच्या मध्ये दोन ते तीन चमचे मध टाका. मध टाकल्यानंतर ते मिश्रण सतत हलवा आणि ते एकत्र करा. हे मिश्रण आपल्या केसांना लावण्यापूर्वी मात्र आपले केस स्वच्छ शाम्पू ने धुवा . आणि त्यावर मात्र कंडिशनर वापरू नका . तुम्हाला कशा पद्धतीने केसांना हे मिश्रण लावायचे आहे , याचा विचार करून ते मिश्रण लावा. आपले केस फक्त हायलाइट करायचे असेल तर सुद्धा हे मिश्रण लावू शकता. पण कमीत कमी चार तास हे मिश्रण ठेवा. त्यामुळे केसांना उत्तम कलर यायला सुरुवात होते. केस धुताना मात्र लगेच धुवू नका . त्यानंतर त्याच्यावर कंडिशनर वापरू नका . त्यामुळे केसांचा कलर हा उडू शकतो. हा उपाय घरगुती पद्धतीचा आहे . त्याचा वापर हा केल्याने कोणत्याही प्रकारचा त्रास हा होणार नाही.