| |

रोज एक लवंग खा आणि ‘या’ समस्या पासून मिळवा सुटका !

हॅलो आरोग्य ऑनलाईन : भारतीय पाककृतीमध्ये लवंगाला एक विशेष स्थान आहे. त्याचा उपयोग केल्याने चवीसह त्याचे काही महत्त्वाचे गुण देखील अन्नात जोडले जातात. याचा वापर तेल आणि अँटिसेप्टिक च्या रूपात केले जाते. आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी लवंगामध्ये बरेच गुणधर्म आहेत. भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच. लवंग हा असाच एक मसाल्याचा औषधी पदार्थ. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. इतर कोणत्याही तेलापेक्षा लवंग तेलामध्ये सर्वाधिक अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आहेत. निरोगी त्वचा आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी अँटीऑक्सिडेंट खूप प्रभावी आहेत. लवंग तेलात पोटॅशियम, सोडियम, फॉस्फरस, लोह, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी सारख्या खनिज पदार्थ जास्त प्रमाणात असतात. जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे…

सायनसपासून सुटका
सायनसपासून सुटका मिळवण्यासाठी लवंग अतिशय फायदेशीर ठरते. सायनस असणाऱ्यांनी रोज ३-४ चमचे लवंगाचे तेल पाण्यात घालून घेऊ शकता. त्यामुळे इंफेक्शन दूर होईल आणि श्वास घेताना होणार त्रास कमी होईल.

रोगप्रतिकारक शक्ती वाढेल

शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास लवंग अतिशय फायदेशीर ठरेल. कारण त्यामुळे इंफेक्शन आणि सर्दी-खोकल्यावर आराम मिळेल. त्याचबरोबर शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल. लवंगात असलेल्या अँटी ऑक्सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.

पोटाच्या समस्येवर गुणकारी

लवंगातील गॅस्ट्रिक रसामुळे पचनक्रिया सुधारते. यासाठी २ लवंग किसून ते अर्धा कप पाण्यात घालून उकळवा. त्यानंतर पाणी थंड झाल्यावर ते प्या. असे रोज तीन वेळा केल्याने गॅसची समस्या दूर होण्यास मदत होईल. गॅस, जळजळीसारख्या समस्यांवर गुणकारी ठरेल.

गर्भारव्यस्थेत फायदेशीर
लवंगामध्ये एंटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मळमळ, उलटीसारखे वाटणे, यावर लवंग चघळणे फायदेशीर ठरते. कारण गर्भारव्यस्थेत अनेक महिलांना सकाळी उठल्यावर उलटी, मळमळ जाणवते. यावर लवंगासारखे दुसरे औषध नाही.

पिंपल्स होतील दूर
लवंगाच्या तेलात अँटी मायक्रोबियल गुणधर्म असतात. त्यामुळे पिंपल्सपासून सुटका मिळण्यास याचा फायदा होतो. पिंपल्स चेहऱ्यावर पसरत देखील नाहीत. चेहऱ्यावरील डाग दूर होतात. लवंगाचा लेप देखील तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता.

दातदुखीवर उपयुक्त
आजकाल टुथपेस्टमध्ये लवंग हा प्रमुख घटक असतो. याचे कारण म्हणजे दातांचे दुखणे दूर करण्यासाठी लवंग उपयुक्त ठरते. दात खूप दुखत असल्यास कापसावर लवंगाचे तेल घेऊन ते दुखत असलेल्या दाताला लावा. दातदुखी पळून जाईल.

मधुमेहावर लाभदायी
आयुर्वेदात मधुमेहावर लवंग लाभदायी असल्याचे सांगितले आहे. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यासाठी लवंग लाभदायी ठरते.

खोकल्यावर होईल फायदा
तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी लवंगाचा फायदा होतो. लवंगाचा नियमित वापर केल्यास या समस्येपासून सुटका मिळेल. रोज सकाळ-संध्याकाळ दोन-तीन लवंग चघळल्यास खोकला दूर होईल आणि तोंडाची दुर्गंधीही दूर होईल.

मेंदूचा ताण कमी करण्याचे
गुणधर्म लवंगामध्ये आहे. तुळस, पेपरमिंट आणि वेलचीसह लवंगा वापरुन आपण सुगंधित चहा बनवू शकता आणि आपण इच्छित असल्यास, मध सह वापरुन आपण तणावातून मुक्त होऊ शकता.