| | |

रिकाम्या पोटी सफरचंद खा आणि मिळवा आश्चर्यकारक फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। सफरचंद हे एक अस फळ आहे, जे आपल्या आरोग्याची उत्तमरीत्या काळजी घेण्यास सक्षम आहे. यामुळे डॉक्टरसुद्धा नेहमी सफरचंद खाण्याचा सल्ला देतात. इतकेच काय तर आजारपणात जो कुणी भेटायला येतो तो येताना सफरचंद घेऊनच येतो. पण बऱ्याचदा असे निदर्शनात येते कि, अनेक लोक सफरचंद साल काढून खाणे पसंत करतात. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि सफरचंद सोलून खाणे हि अत्यंत मोठी चूक आहे. याशिवाय जेवणानंतर सफरचंद खाणे देखील फारसे लाभदायी नसते. त्यामुळे या चुका टाळा आणि सफरचंदाचे खरंच फायदे अनुभवायचे असतील तर न चुकता सकाळी रिकाम्या पोटी सफरचंदाचे सेवन करा.

सफरचंदामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फोलेट, लोह आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात. शिवाय व्हिटामिन सी आणि ए, फायबर देखील असते. यामुळे पोटाच्या कोणत्याही विकारांपासून बचाव होतो. शिवाय रोग प्रतिकारक शक्ती वाढते. चला तर जाणून घेऊयात उपाशी पोटी सफरचंद खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१. रोग प्रतिकार शक्तीत वाढ – सफरचंदातील व्हिटॅमिन ‘सी’ रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. म्हणून कोणत्याही आजारपणात रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्याने शरीराला फायदा होतो.

२. शरीर डिटॉक्सिफाई करणे – अँपल व्हिनेगर शरीरातील विषारी द्रव्ये काढून शरीर डिटॉक्स करते. मुळातच अँपल व्हिनेगरमध्ये अँटीऑक्सिडेंट असतात, जे आपल्या शरीरास डिटॉक्स करण्यास मदत करतात आणि रोगांपासून शरीराचा बचाव करतात.

३. पोषक घटकांचा खजिना – सफरचंदाच्या सालात पोटॅशियम, कॅल्शियम, फोलेट, लोह आणि फॉस्फरस सारखी खनिजे असतात. यामुळे सफरचंद सालीसकट खाणे हे फायदेशीर मानले जाते. तसेच सफरचंदातील फायबर पोटाच्या आरोग्यासाठी लाभदायी असते. त्यामुळे रिकाम्या पोटी सफरचंद खाणे आणखी फायदेशीर मानले जाते.

४. वाढत्या वजनावर नियंत्रण – सफरचंद शरीरातील फॅट बर्न करतात आणि यामुळे लठ्ठपणा नियंत्रणात राहतो. शिवाय पचनशक्ती सुलभ करून चयापचय मजबूत करण्याचे कामदेखील सफरचंद करते. परिणामी वजन नियंत्रित राहते. तसेच रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यास ते पचायला जास्त वेळ लागतो. त्यामुळे बराच वेळ पोट भरल्याची भावना येते.

० महत्वाचे – सफरचंद जेवणाआधी वा जेवणानंतर खाल्लयास त्यातील पोषक तत्वांचा शरीराला लाभ होत नाही. त्यामुळे रिकाम्या पोटी सफरचंद खाल्ल्यामुळे शरीराच्या आरोग्यासाठी भरपूर फायदे होतात.