Anjeer
| | |

आरोग्यदायी फायद्यांसाठी असे करा अंजीरचे सेवन; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। आपण काय खातो..? किती खातो..? कधी खातो..? अशा फूड सायकलचा आपल्या आरोग्यावर परिणाम होत असतो. त्यामुळे आहाराबाबत सतर्क असणे नेहमीच आवश्यक आहे. यासाठी आहारचे योग्य संतुलन राखणे गरजेचे असते. म्हणून दैनंदिन आहारात विविध पालेभाज्या, फळभाज्या, दूध, दुग्धजन्य पदार्थ, डाळी, कडधान्ये याचबरोबर मर्यादित प्रमाणात मांस, मटण आणि विविध फळांचा समावेश करायला हवा. या फळांपैकी अंजीर हे एक असे फळ आहे जे ताजे आणि सुकविलेले अशा दोन्ही प्रकारे खाता येते. यातील विविध तत्त्वे आपल्या आरोग्यविषयक अनेकल तक्रारींपासून सुटका देतात.

० आरोग्यासाठी फायदेशीर ताजे अंजीर कि सुके अंजीर..?

अंजीर या फळामध्ये आर्द्रता, पिष्टमय पदार्थ, प्रथिने, मेद, कार्बोहायड्रेट, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, तंतुमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते. अंजीर स्वभावाने थंड असले तरी ते पचण्यास थोडे जड असते.

हल्ली अंजीर वाळवून ते ड्रायफ्रूट म्हणून आहारामध्ये वा मिठाईमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. पण सुक्या अंजीरपेक्षा ताजे अंजीर जास्त पौष्टिक आणि शरीरासाठी फायदेशीर असते. कारण ताज्या अंजीराच्या सेवनाने पोषक घटक जास्त प्रमाणात शरीरात शोषले जातात. तर सुक्या अंजीराच्या सेवनाने क्षार आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात मिळतात.

० अंजीर कसे आणि किती खावे..?

० अंजीर खाण्याचे फायदे

1. अंजीर खाल्ल्याने शरीरातील रोग प्रतिकारक शक्ती वाढते. शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे. कारण अंजीर स्वभावाने थंड असते.

2. अंजिराच्या सेवनाने यकृताचे कार्य सुरळीत होते. शिवाय डांग्या खोकला, दमा अशा विकारांसाठी अंजीर खाणे फायदेशीर आहे.

3. जागरण, अति चहा वा धूम्रपान, दारू पिणे अशा सवयींमुळे शरीराचे नुकसान होते. दरम्यान शरीराची झालेली ही हानी भरून काढण्यासाठी रोज ताजे अंजीर खा. यातील औषधी गुणामुळे पित्त विकार, रक्तविकार आणि वात दूर होतो.

4. अंजीरातील गरामध्ये कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे नियमित ताजे अंजीर खाल्ल्याने शरीरातील हाडे आणि स्नायूंना मजबुती मिळते.

5. अंजीरातील फायबर पोट साफ होण्यास मदत करते. त्यामुळे ताजे असो वा सुकलेले कोणतेही अंजीर बद्धकोष्ठतेचा त्रास आटोक्यात ठेवते. याशिवाय अपचन, पोटदुखी अशा पोटाच्या कोणत्याही समस्यांमध्ये अंजीर खाणे फायदेशीर आहे.

6. अंजीरमध्ये समाविष्ट असलेले ओमेगा ३ आणि ओमेगा ६ घटक मुबलक असतात. त्यामुळे हृद्याचे आजार नियंत्रणात राहतात.

7. अंजीरातील उच्च तंतुमय पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात. दरम्यान सुक्या अंजिरात उष्मांक जास्त असतो. ज्यामुळे वजन कमी करणे सोपे जाते. शिवाय ज्यांना वजन वाढवायचे आहे त्यांनी अंजीर दुधात भिजवून खाल्ल्यास वजनही वाढण्यास मदत मिळते.

8. चाळीशीनंतर महिलांमध्ये आरोग्यविषयक तक्रारी उदभवतात. अशावेळी अंजीराचे सेवन महिलांच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता भरून काढते. यामुळे त्यांचे स्नायू बळकट राहतात. ज्यामुळे सांध्यांचा त्रास कमी होतो. तसेच महिलांमध्ये स्तनाचा कर्करोग होण्याची संभावना कमी होते.

अंजीरापासून अनेक फायदे असले तरीही याचे जास्त सेवन करू नये. कारण सुके अंजीर जास्त खाल्ल्यास दात सडण्याचे कारण बनू शकते. तसेच ज्यांना अंजीरची एलर्जी आहे त्यांनी अंजीर खाऊ नये.