| |

‘खा बीट, रहा फिट’; जाणून घ्या आरोग्यवर्धक फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। जर आपण आपल्या रोजच्या आहारात बीटाचे सेवन केले तर आपल्या आरोग्याला त्याचे अनेक गुणकारी फायदे होऊ शकतात. कारण बीटामध्ये भरपूर औषधी गुणधर्म आहेत आणि याच्या सेवनाने अनेक आरोग्याशी संबंधित समस्या दूर होतात. जसे कि, बीट रक्तातील वाढीव साखरेचे प्रमाण कमी करते, सेक्शुअल हेल्थ आणि स्टॅमिना वाढवते, मधुमेहावर नियंत्रण ठेवते, गर्भवती महिलां तसेच कँसर रुग्णांसाठीसुद्धा फायदेशीर असते. या व्यतिरिक्त देखील बीट खाण्याचे अनेक फायदे आहेत. तेच फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

  • बीट खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे:-

१) कॅल्शिअमयुक्त – कॅल्शिअम शरिरासाठी महत्त्वाचे आहे आणि बीट कॅल्शिअमची पूर्तता करतो. यामुळे बीट खाल्ल्याने शरिरातील कॅल्शिअमची कमतरता दूर होते. विशेष करून लहान मुलांनी आणि युवकांनी बीट कच्चे चावून खाल्ले पाहिजे. यामुळे दात आणि हिरड्या मजबूत राहतात.

२) ऑस्टियोपोरोसिस – बीटमधील मिनरल सिलिकामुळे शरीर कॅल्शियमचा योग्य प्रकारे वापर करते. दिवसातुन २ वेळा बीट ज्युस प्यायल्याने ऑस्टियोपोरोसिस (हाडांचा रोग) आणि हाडांच्या इतर समस्या तसेच दातांच्या समस्या होत नाहीत.

३) अॅनेमिया – बीटात मोठ्या प्रमाणात आयर्न असते. आयर्नमुळे हीमाग्लूटनिनि तयार होते. हे ऑक्सीजन आणि अनेक पोषकतत्त्व शरीरात सर्वत्र पोहचवते. बीटमधील हेच आयर्न तत्त्व अॅनेमियात लाभदायक ठरते. याकरिता रोज सकाळी १ कप बीटचा रस प्यायल्याने फायदा होता. शिवाय किडनी स्टोनची समस्यादेखील दूर होते. रोज ३० ग्रॅम बीट खाल्याने लीवरची सूज देखील कमी होते.

४) उच्च रक्तदाब – बीट खाल्याने उच्च रक्तदाब पूर्णपणे नियंत्रणात राहते. यात गाजर आणि बीटचा १ – १ कप रस पिणे फायद्याचे ठरते. ब्लडप्रेशर असलेल्या व्यक्तींनी तर न चुकता आहारात बीट खावे.

५) थकवा – बीट थकवा दुर करण्यास मदत करते. याचे नायट्रेट तत्त्व धमन्यांचा विस्तार करतात. यामुळे संपूर्ण शरीराला ऑक्सीजन योग्य प्रमाणात मिळते आणि शारीरिक ऊर्जा वाढते. याव्यतिरिक्त बीटमधील आयर्नमुळे स्टॅमिनादेखील वाढतो.

६) सांधेदुखी – बीटमध्ये सोडियम, पोटेशियम, फॉस्फरस, कॅल्शिअम, सल्फर, क्लोरीन, आयोडीन, आयरन, विटामिन बी१, बी२ आणि सी मोठ्या प्रमाणात असतात. यामुळे सांधेदुखीचा त्रास कमी होतो. शिवाय बीटमध्ये कॅलरीज खूप कमी असतात यामुळे शरीरातील मेद वाढत नाही.

७) बुध्दी वाढ – नायट्रेट तत्वामुळे बीटचा ज्यूस प्यायल्याने व्यक्तिचा स्टॅमिना १६ टक्क्यांनी वाढतो. शरीरातील ऑक्सीजन वाढल्यामुळे मस्तिष्क सुध्दा योग्यप्रकारे काम करते. शिवाय स्मरणशक्ती देखील वाढते.

८) कफ – बीट श्वसननलिका स्वच्छ ठेवते. परिणामी कफ होण्याची समस्या दूर होते. शिवाय बीटच्या रसात मध टाकून लावल्याने शरिरावर खाज येण्याची समस्या देखील नाहीशी होते.

९) गॅसची समस्या – बीटमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्याने पोटाशी संबंधित कोणत्याही समस्या दूर होतात. याकरिता, बीटाचा २ चमचे रस आणि १ लहान चमचा मध एकत्र खाल्याने गॅसची समस्या दूर होते

१०) महिलांसाठी लाभ – बीटमध्ये फॉलिक अॅसिड असते. जे गर्भवती महिला आणि गर्भात असलेल्या बाळासाठी फायदेशीर असते. बीटमुळे महिलांना आंतरिक ऊर्जा मिळते. यामुळे दूध वाढते. शिवाय, मासिक पाळी जर नियमित येत नसेल आणि यावेळी त्रास होत असेल तर बीट खाल्याने त्यापासूनही सूटका होते. रक्त वाढीसाठीदेखील बीट फायदेशीर असते.