| |

काळे चणे खा आणि मिळवा खास आरोग्यवर्धक फायदे; जाणून घ्या

हॅलो आरोग्य ऑनलाईन। काळ्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि मिनरल्स असतात. इतकंच नव्हे तर यांसोबतच काळ्या चण्यांमध्ये व्हिटॅमीन ए, व्हिटॅमीन बी, व्हिटॅमीन सी, व्हिटॅमीन डी, व्हिटॅमीन के आणि फॉस्फरस, पोटॅशियमदेखील आढळते. त्यामुळे जर दैनंदिन आहारात काळे चणे खायला सुरुवात केली तर शरीर स्ट्रॉंग, मेंदू तल्लख आणि हृदय निरोगी राहते. याव्यतिरिक्त देखील काळ्या चण्याचे आरोग्याशी संबंधित असे अनेक फायदे आहेत जे कित्येकांना ठाऊकही नाहीत. म्हणून आपण काळ्या चण्याचे आरोग्यवर्धक फायदे जाणून घेणार आहोत.

  • काळ्या चण्याचे आरोग्याशी संबंधित फायदे खालीलप्रमाणे:-

१) वेट लॉस (वजन कमी करणे) – काळ्या चण्यामध्ये आपल्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची लेव्हल वेगाने कमी करण्याची क्षमता असते. म्हणूनच काळे चणे खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते आणि त्यात आढळणारे फायबर हे वेट लॉससाठी अर्थात वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते. यातील न्युट्रिशन्ल व्हॅल्यू मिळवण्यसाठी सॅलडमध्ये वापरा.

२) बद्धकोष्टतेपासून आराम – काळा चण्यांमध्ये आढळणारे फायबर हे पचण्यासाठी अतिशय हलके असते. त्यामुळे दररोज चणे खाल्ल्याने पोटाशी संबंधित अनेक आजारांपासून आराम मिळतो. शिवाय पोटाचे विकार कमी होण्यास मदत होते. यासाठी काळे चणे कच्चे किंवा उकडून खाल्ले असता बद्धकोष्ठतेची समस्या लवकर दूर होते.

३) निरोगी हृदय – एका संशोधनानुसार काळ्या चण्यांमध्ये भरपूर प्रमाणात ऍन्टि ऑक्सिडन्ट असतात. जे आपल्या हृदयासाठी अत्यंत फायदेशीर आहेत. शिवाय काळ्या चण्यांमध्ये आढळणारे फायबर आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करतात. परिणामी हृदयाचे कार्य सुरळीत राहते आणि ते निरोगीदेखील राहते.

४) मधुमेह – काळे चणे मधुमेहाच्या रुग्णांसाठी अगदी सुपर फूड मानले जाते. कारण एक मुठ काळ्या चण्यांमध्ये साधारण १३ ग्रॅम डायटरी फायबर समाविष्ट असते. ज्यामुळे शरीरातील रक्तात असणाऱ्या साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते. त्यामुळे मधुमेह आजाराची तीव्रता आणि शरीरात वाढलेल्या साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे सोप्पे जाते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *