| | | |

सकाळच्या न्याहारीत काळे चणे खा आणि निरोगी रहा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। निरोगी राहणे कुणाला नको असते? म्हणूनच तर कितीही धावपळ असो गडबड असो प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपल्या आरोग्याची काळजी घेत असते. पण मित्रांनो आज आम्ही तुम्हाला एकदम सोप्पा आणि हेल्दी असा नाश्ता सांगणार आहोत जो तुमच्या नकळत तुमच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेण्यास सक्षम आहे. निरोगी जगायचे असेल तर दैनंदिन न्याहारीत भिजवलेल्या काळ्या चण्याचा समावेश करणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कारण काळ्या चण्यांमध्ये क्लोरोफिल, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी, फॉस्फरस, पोटॅशियम आणि मॅग्नीशियमची मात्रा अधिक असते. या सर्व पोषक तत्त्वांची शरीराला भासणारी गरज काळे चणे खाल्ल्यामुळे पूर्ण होते. तसेच काळ्या चण्यांचा ग्लाईसेमिक इन्डेस्क कमी असतो. त्यामुळे वजन कमी करायचे असेल तर काळेचणे एक उत्तम पर्याय आहे. चला तर जाणून घेऊयात काळे चणे खाण्याचे फायदे खालीलप्रमाणे:-

१) मजबूत रोग प्रतिकार शक्ती – रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काळे चणे खाणे फायदेशीर आहे. यासाठी आदल्या दिवशी रात्री काळे चणे ७ ते ८ तास पाण्यात भिजवा. हे खाल्ल्याने दिवसभर शरीरात ऊर्जा कायम राहते. शिवाय पित्त, कफ या समस्या दूर होतात.

२) निरोगी रक्त वाहिन्या – भिजवलेले काळे चणे अँटि ऑक्सिडंट्स आणि फायटो न्यूट्रिएंट्सने परिपूर्ण असतात. यामुळे आपल्या शरीरातील रक्तवाहक वाहिन्यांना निरोगी राहण्यासाठी मदत होते.

३) शरीरातील रक्ताची पूर्तता – चण्यामध्ये लोह अधिक असते. यामुळे काळे चणे खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होते. शिवाय शरीरातील उर्जा देखील दुप्पट वाढते. हे शरीरात हिमोग्लोबिन वाढविण्यासाठी काळे चणे खाणे फायदेशीर आहे.

४) डोळ्यांच्या पेशींचे संरक्षण – डोळ्यांसाठी काळे चणे खाणे फायदेशीर आहे. कारण काळ्या चण्यांमध्ये कॅरोटीन असते. हा घटक प्रामुख्याने डोळ्यांच्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करतो आणि डोळ्यांची निगा राखतो.

५) बद्धकोष्ठतेवर प्रभावी – चण्यातील फायबर पचन संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करते. यामुळे आपली पचनक्रिया व्यवस्थित सुरु राहते आणि पाचक प्रणाली निरोगी राहते. शिवाय बद्धकोष्ठतेपासूनसुद्धा अराम मिळतो. ज्यांना बद्धकोष्ठता आहे त्यांनी भिजलेल्या चण्यासोबत त्याचे पाणीही प्यावे.

६) लठ्ठपणावर फायदेशीर – लठ्ठपणा कमी करण्यासाठी काळे चणे फायदेशीर आहे. कारण यामध्ये ग्लाइसेमिक इंडेक्स कमी असते. परिणामी भूक कमी होते आणि यामुळे अतिरिक्त खाणे थांबते. ज्यामुळे लठ्ठपणा कमी करता येतो.

७) सुंदर त्वचा आणि केस – काळ्या चण्यांमध्ये व्हिटॅमिन- ए, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन- ई असते. हे केसांची मुले मजबूत करतात तर त्वचेला आतून स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दररोज सकाळी काळे चणे खाल्ल्यामुळे त्वचा आणि केसांना फायदा होतो.