Boiled Black Gram
| | |

उकडलेले हरभरे खा आणि आरोग्यात सुधार आणा; जाणून घ्या फायदे

हॅलो आरोग्य ऑनलाईन। वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी वाढवण्यापर्यंत एकापेक्षा एक जबरदस्त फायदे हवे असतील तर आपल्या रोजच्या आहारात न चुकता उकडलेल्या हरभऱ्याच्या चण्यांचा समावेश करा. कारण उकडलेले हरभरे खाणे आरोग्यासाठी अतिशय चांगले असते. आता तुम्हाला जर तुमच्या आरोग्याची काळजी असेल आणि आरोग्यात सुधारणा हवी असेल तर तुम्ही उकडलेले हरभरे खाणे आवश्यक आहे.

उकडलेला हरभरा

हरभरा ऊर्जेचा स्रोत मानला जातो. याचे कारण म्हणजे हरभऱ्यामध्ये कार्बोहायड्रेट, लोह, प्रथिने, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि इतर पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात. यामुळे शरीराला यातून मुबलक प्रमाणात ऊर्जा आणि आवश्यक जीवनसत्त्वे मिळतात.

अनेकदा हरभरा खाल्ल्यावर कितीतरी लोकांना अपचन किंवा गॅस झाल्यासारखे वाटते. अशावेळी हरभरा खूपच फायदेशीर मानला जातो. कारण यामुळे शरीरातील अनावश्यक घटक उत्सर्जित करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे संकेत मिळत असतात. तुम्ही दैनंदिन आहारात उकडलेल्या हरभऱ्याचे काळ्या मीठासोबत सेवन करू शकता. याशिवाय त्याची भेळ, भाजी, आमटी असे कोणतेही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकता. चला तर जाणून घेऊयात उकडलेला हरभरा खाण्याचे फायदे खालिलप्रमाणे:-

1. रोगप्रतिकार शक्तीत वाढ – रोगप्रतिकार शक्ती आपल्या शरीराचे कोणत्याही आजारापासून वा संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचे काम करते. त्यामुळे आपल्या शरीराची तुम्हाला कोणत्याही आजारापासून वाचवण्यास मदत करते आणि तुमची प्रतिकारशक्ती चांगली ठेवल्यास तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता.

2. ब्लड शुगरवर नियंत्रण – ज्या लोकांना शुगरची समस्या आहे त्यांनी आपल्या रोजच्या आहारात उकडलेल्या हरभऱ्याचे सेवन केल्याने शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. याचा रुग्णांना फायदा होतो.

3. कॅन्सरचा धोका कमी – कॅन्सरपासून बचावासाठी उकडलेला हरभरा खाणे कधीही फायदेशीर. कारण उकडलेले हरभरे खाल्ल्याने कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते. तर हरभऱ्यामध्ये असलेले ब्युटीरेट अॅसिड कर्करोगाचा धोका कमी करते.

4. पचनक्रिया होईल मजबूत – उकडलेले हरभरे आपली पचनक्रिया मजबूत करतात. त्यामुळे पचनसंस्था बिघडली वा पचनाच्या कोणत्याही समस्या असतील तर फायबरयुक्त हरभरा खाणे फायदेशीर आहे.

5. दृष्टीसाठी लाभदायक – हरभऱ्यातील बिटा कॅरोटीनमुळे दृष्टीसाठी आवश्यक पेशींचे नुकसान होत नाही. तसेच यामुळे दृष्टीसुधारदेखील होतो. म्हणून आपल्या आहारात उकडलेला हरभरा असेल याची काळजी घ्या.

6. वजनावर नियंत्रण – वजन कमी करणे कठीण आहे पण अशक्य नाही. यासाठी उकडलेला हरभरा फायदेशीर आहे. कारण हरभऱ्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स असते. हे वाढते वजन कमी करण्यास मदत करते.